Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मी काही बोलल्यास बातमी होते; 'लोक माझे सांगाती' पुस्तकावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मी काही बोलल्यास बातमी होते; ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचा दुसऱ्याचे भागाचे आज प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात शरद पवार यांच्याकडून एक गोप्यस्फोट करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. अशातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीबाबत लिहिण्यात आल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचा दुसऱ्याचे भागाचे आज प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात शरद पवार यांच्याकडून एक गोप्यस्फोट करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. अशातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीबाबत लिहिण्यात आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सवाल विचारण्यात आला असता त्यांनी ‘सकाळच्या शपथविधीबाबतच्या पुस्तकातील उल्लेखाबाबत मी काहीच वाचलेले नाही’, असे उत्तर दिले. (If I say something it becomes news Ajit Pawar reaction to the book Lok Maze Sangati)

नेमके काय म्हणाले अजित पवार?

- Advertisement -

“सकाळच्या शपथविधीबाबतच्या पुस्तकातील उल्लेखाबाबत मी काहीच वाचलेले नाही. कारण मी काही बोलल्यास त्याची बातमी होते. मला त्या संदर्भात काहीच माहिती नाही. मी पुस्तक वाचतो आणि त्यानंतर बोलतो”, असे शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाबाबत अजित पवार म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेतला माझा कोणताही मुद्दा मी चुकीचा मांडलेला नाही. बदल्यांमध्ये रेट ठरलेले आहेत, असा राजू शेट्टी यांनी केला होता. याबाबत मी कुठेच काहीच बोललेलो नाही. राजू शेट्टी एकेकाळी भाजपा, त्यानंतर आघाडी वेगवेगळ्या ठिकाणी असतात”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – “सभेला झालेली गर्दी पाहता महाराष्ट्रात, दिल्लीत सत्तांतर नक्की..” संजय राऊतांचा दावा

- Advertisment -