घरमहाराष्ट्र"सभेला झालेली गर्दी पाहता महाराष्ट्रात, दिल्लीत सत्तांतर नक्की.." संजय राऊतांचा दावा

“सभेला झालेली गर्दी पाहता महाराष्ट्रात, दिल्लीत सत्तांतर नक्की..” संजय राऊतांचा दावा

Subscribe

राज्यात महाविकास आघाडीकडून 'वज्रमूठ' सभा (MVA Vajramuth Meeting) घेण्यात येत आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या बिकेसीतील मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी 'वज्रमूठ' सभा पार पडली.

राज्यात महाविकास आघाडीकडून ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Meeting) घेण्यात येत आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या बिकेसीतील मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. पण या सभेमुळे महाविकास आघाडीत असलेल्या नाराजी नाट्यावर पडदा पडल्याचे दिसून आले. सभेच्या आधी सत्ताधाऱ्यांकडून तर सभेच्यानंतर विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार टीका आणि शाब्दिक वार करण्यात येत होते. पण आता सभेला लोकांनी केलेली गर्दी आणि त्यामुळे मिळालेला आत्मविश्वास यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी सभेचा फोटो पोस्ट ट्वीट करत भाजपला डिवचले आहे. तर “मविआच्या कालच्या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तांतर नक्की आहे,” असा दावा राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

हेही वाचा – महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’चा तडाखा बसण्याची भाजपाला भीती, ठाकरे गटाची टीका

- Advertisement -

“मविआच्या कालच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद पाहता भाजपा अजून दहा वर्षं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचं धाडस करेल असे दिसत नाही.पण त्या आधीच महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तांतर नक्की आहे. दारूण पराभव निश्चित आहे. मुंबई शिवसेनेचीच! जय महाराष्ट्र!” असे ट्वीट संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेले आहे. तर गेल्या एक-दीड वर्षांपासून लांबणीवर पडलेली मुंबई महानगर पालिकेची निवडणूक घेण्याचे धाडस पुढील 10 वर्षे तरी भाजपकडून करण्यात येईल, असा टोला देखील संजय राऊत यांनी या ट्वीटच्या माध्यमातून लगावला आहे.

- Advertisement -

 

सभा सुरू होण्याआधी भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार ज्या जागी ही सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला होता. याबाबतचे ट्वीट सुद्धा आशिष शेलार यांनी केले होते. “जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते.. एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते.. अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होते आहे… ही वज्रमुठ?.. मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे!.. शिवाजी पार्क सोडले, बिकेसीतील मोठी मैदाने घेणे आता टाळले… उबाठाचा प्रवास “ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे” असल्याने भविष्यात नरे पार्कातच सभा होतील असे वाटतेय!” अशा आशयाचे ट्वीट आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आले होते. तर त्यांच्या या ट्वीटला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रत्युत्तर देत म्हंटले होते की, ‘शेलारांना मोदींसाठी सभा घ्यायची असेल तर ती इथेच घ्यावी लागेल.’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -