घरमहाराष्ट्रमंत्रालयात जर बैठका होतात तर पालिकेत झुमअॅपद्वारे बैठका का?; रईस शेख यांचा...

मंत्रालयात जर बैठका होतात तर पालिकेत झुमअॅपद्वारे बैठका का?; रईस शेख यांचा सवाल

Subscribe

भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाचा दूर पळण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाचे गटनेते,आमदारांचा महापौर,आयुक्तांना सवाल

एका बाजुला मुख्यमंत्री महोदय आणि मंत्र्यांच्या सभा मंत्रालयात व्यवस्थित पार पडत असताना, महापालिकेत कोरोनाची भीती दाखवत झूम अॅपद्वारे सभा घेण्याचे प्रयोजन करण्याचा घाट घातला जातो. कोरोनाच्या उपाययोजनांवर केलेल्या खर्चाबाबतच्य भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करण्याचे धाडस सत्ताधारी पक्षामध्ये नसल्यानेच झूम अॅपद्वारे गटनेत्यांची सभा घेत आरोपांपासून दुर पळण्याचा प्रयत्न सत्ताधार पक्ष व प्रशासनातील अधिकारी करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते व आमदार रईस शेख यांनी केला आहे. त्यामुळे गटनेत्यांची सभा झूम अॅपऐवजी न घेता प्रत्यक्ष बैठकीचे आयेाजन आपल्या दालनातच केले जावे, अशी शेख यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोविड-१९ च्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर मार्च महिन्यानंतर महापालिकेची एकही सभा तसेच इतर समित्यांच्या सभाही होवू शकलेल्या नाहीत. ४ मार्च २०२० रोजी गटनेत्यांची सभा घेण्यात आली होती. त्यानंतर गटनेत्यांची एकही सभा आयोजित करण्यात आलेली नाही. परंतु कोविड-१९ सारख्या आजाराचा सामना करताना तसेच त्यासाठी उपाययोजना राबवताना औषधांचा पुरवठा, रोगाचे निदान करण्यासाठी चाचणी, तपासणी आदी प्रकारची कामे करण्यात आली. तसेच अनेक उपक्रम राबवण्यात आले. पण यावर प्रशासनाकडून जो खर्च करण्यात आला, त्याबाबतची माहिती नगरसेवकांना अथवा गटनेत्यांनाही दिलेली नाही, याबाबत समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते व आमदार रईस शेख यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जो पैसा खर्च केला आहे,त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता राहलेली नाही. तसेच या खर्चामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करत याबाबत महापालिका आयुक्तांनी प्रशासनाने केलेल्या खर्चाबाबतत खुलासा करणे अभिप्रेत आहे. परंतु आयुक्त याबाबत खुलासा करू इच्छित नाही. त्यामुळे प्रशासन एकप्रकारे लोकशाहीचा गळा घोटत नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आणून त्यांची पायमल्ली करत असल्याचा आरोप रईस शेख यांनी केला आहे.


हेही वाचा – मुंबईत आज १ हजार ४६० नव्या रुग्णांची नोंद; ४१ मृत्यू

- Advertisement -

वास्तविक पाहता प्रशासनाने महापालिकेची सभा किंवा गटनेत्यांची सभा आयोजित करून त्यावर साधक बाधक चर्चा करून गटनेत्यांशी सल्लामसलत करून कोविडच्या आजारावर मात करण्याच्या दृष्टीन निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने गटनेत्यांची सभा न घेता एकाधिकारशाहीचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरेानासंदर्भात झालेल्या खर्चाबाबत खुलासा होण्यासाठी आणि याबबतत चर्चा करण्यासाठी गटनेत्यांची सभा झूम अॅपद्वारे न करता आपल्या दालनात त्वरीत आयोजित करण्याची मागणीही रईस शेख यांनी महापौरांकडे केली आहे.


हेही वाचा – राज्यात आज ५३१८ नव्या रुग्णांची नोंद; ४४३० रुग्ण बरे होऊन घरी परतले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -