घरमहाराष्ट्रहिंमत असेल तर अदानींना नोटीस पाठवा; संजय राऊतांचे सरकारला आव्हान

हिंमत असेल तर अदानींना नोटीस पाठवा; संजय राऊतांचे सरकारला आव्हान

Subscribe

आम्ही मुलीचे लग्न लावले किंवा घर घेतली की, आम्हाला नोटिसी पाठवण्यात येतात. पण हिंमत असेल तर गौतम अडाणी यांना नोटीस पाठवून दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी सरकारला केले आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदे गटच खरी शिवसेना बनला आहे. पण यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी आणि बंडखोरांवर हल्लाबोल करण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रा घेण्यात येत आहे. कोल्हापूरात आयोजीत करण्यात आलेल्या शिवगर्जना यात्रेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या शिवगर्जना यात्रेतून जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत केंद्रीय मंत्री अमित शाह यांना मोगँबो असे संबोधले.

कोल्हापुरातील शिवगर्जना यात्रेमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, आपल्या सगळ्या आमदारांना हल्ली चौकशीसाठी बोलावत आहेत. एसीबी, ईडीकडून वारंवार चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे. हिंमत असेल तर गौतम अदानीला नोटीस पाठवा, असे आव्हान राऊतांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला केले आहे. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेतील गोरगरिबांचा हक्काचा पैसा अदानीला देण्यात आला आणि त्याने तो बुडवला तरी त्याच्यावर कोणाची बोलायची हिंमत नाही किंवा त्याला नोटीस पाठवायची हिंमत नाही असे म्हणत राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही. पण आम्ही मुलीचे लग्न लावले किंवा घर घेतले तरी नोटिसी पाठवून कारवाई करण्यात येते, असा खोचक टोला यावेळी राऊतांनी लगावला. तसेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. कायद्याने नाव, चिन्ह आपल्याकडे नाही तरीही तुम्ही आला हेच आपलं भांडवल आहे. तुम्ही आता निवडणुका घ्या 150 जागा आम्ही जिंकू असे आव्हानही राऊत यांनी दिले. तुमचं, मन, आत्मा तुम्ही विकला आहात. काय कमी केलं शिवसेनेनं? खोके दिलं नाहीत, पण मान सन्मान दिला. भाव वाढवला, अदानीसारखा भाव खाली आला नाही, अशी टीका देखील शिंदे गटावर करण्यात आली आहे.

40 गद्दारांनी धडे देऊ नयेत
यावेळी संजय राऊत यांनी 40 गद्दारांवर देखील आगपाखड केली. यावेळी ते म्हणाले की, “40 गद्दारांनी धडे देऊ नयेत. त्यांची राजकीय अंत्ययात्रा निघणार आहे. शिवगर्जना राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाही. अमित शाह आले होते कोल्हापुरात, मोगँबो खूश होकर गया क्या? आणखी काही बोलायला नको, त्यांचा आदर केला नाही तर परत हक्कभंग आणतील. शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळणं हा सत्याचा विजय आहे असे अमित शाह कोल्हापुरात म्हणाले होते. याबाबत बोलताना राऊचत म्हणाले की, हा सत्याचा विजय म्हणत आहात. तुम्हाला काय सत्य माहित? सत्य 2024 ला कळेल. दिल्ली महाराष्ट्रात आमचं राज्य असेल. गद्दारांच्या हातात महाराष्ट्र देता, त्यांच्या हातात चाव्या देता. तुम्ही वाघाच्या शेपटीवर पाय दिला आहे. हा जखमी झालेला वाघ आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणणं हे कितपत योग्य?, दानवेंचा सवाल |

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -