घरCORONA UPDATEकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने तयार केले 'सॅनिटाझर टनल'

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने तयार केले ‘सॅनिटाझर टनल’

Subscribe

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने 'सॅनिटाझर टनल' उभारले आहेत.

कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. याचा फटका आता देशाला देखील बसला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या रेल्वेने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चांगलीच कंबर कसली असून आतापर्यंत २ हजार ५०० डब्यांचे आयसोलेशन कक्षांत रूपांतर केले आहे. आता त्याच्या पाठोपाठ मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने इन-हाउस एक अत्याधुनिक सॅनिटाझर टनलची निर्मिती केली आहे. चक्क दोन दिवसात हे टनल तयार करण्यात आले आहे.

सॅनिटाझर टनल

मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेड भुसावळ विभागने दोन दिवसाच्या कालावधीत कोरोनाविरोधात लढण्यासाठी एक इन-हाउस, सॅनिटाझर टनल (निर्जंतुकीकरण बोगदा) तयार केले आहे. त्याचपाठोपाठ आता पनवेल आणि कल्याणमध्ये सुद्धा असे विविध पद्धतीचे सॅनिटाझर टनल तयार करण्यात येणार आहे. कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सॅनिटाझर टनल तयार करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा होऊ नये, म्हणून मध्य रेल्वे सर्व उपायोजना करत आहेत. त्यातील एक भाग म्हणून सॅनिटाझर टनल उभारण्यात आला आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता, (टीआरएस) भुसावळ हिमांशु रामदेव यांच्या नेतृत्वाखाली हे डिझाईन तयार करण्यात आले आहे. वरिष्ठ विभाग अभियंता मुकेश चौधरी यांच्या देखरेखीखाली हे तयार करण्यात आले असून मध्य रेल्वेच्या अत्याधुनिक सॅनिटाझर टनल अवघ्या ३ सेकंदांच्या अवधीत एखाद्या व्यक्तीस डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण निर्जंतुकीकरण करू शकते. याला तयार करण्यासाठी रेल्वेला सुमारे १५ हजाररुपयांचा खर्च आला आहे.

तीन सेकंदात पूर्णपणे निर्जंतुकीकरण

मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने या अत्याधुनिक सॅनिटाझर टनल तयार करण्याकरिता अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. या सॅनिटाझर टनलमध्ये पीव्हीपी पाईपिंग आणि स्प्रे नलिकाच्या समावेश आहे. या टनेलचा आकार १५० सेमी × १५० सेमी × २२० सेमी पर्यंत आहे. या टनलमध्ये तीन नोजल असून कर्मचारी ज्यावेळी या टनेलमध्ये चालत असेल त्यावेळी त्यांच्यावर तीन ते पाच सेकंद कालावधीसाठी हा टनल संच फवारला जाईल. पृष्ठभागावर संपर्क साधल्यानंतर विषाणू नष्ट करण्यास ते पुरेसे कार्यक्षम आहे. कार्यक्षम निर्जंतुकीकरण सुनिश्चित करण्यासाठी कर्मचार्‍यांना बोगद्यात प्रवेश करताना त्यांचे हातवर आणि पुढील बाजूस करून उभे राहण्याचा सल्ला दिला जातो.

- Advertisement -

टनलची ५०० लिटर क्षमता

सॅनिटाझर टनलची क्षमता ५०० लिटर आहे. या ५०० लिटरमध्ये तब्बल १६ तास सतत सॅनिटायझर टनल सुरू राहू शकतो. या सॅनिटायझर टनला एका दिवसात दोनदा रिफिलिंग करण्याची आवश्यकता असते. तसेच विजेची आणि पाण्याच्या बचत करण्याकरिता दोन्ही साईडला स्विच देण्यात आले आहे. जेणेकरून कर्मचारी आता शिरताच बटन दाबून सॅनिटायझर टनल सुरु करता येतो आणि बाहेर निघताच तो बट दाबून बंद करता येतो.

याकठीण परिस्थितीत अत्यावश्यक सेवामध्ये रेल्वे कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेची आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा होऊ नये, म्हणून मध्य रेल्वे सर्व उपायोजना करत आहेत. त्यातील एक भाग म्हणून सॅनिटाझर टनल उभारण्यात आला आहे. – ए.के. जैन वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे


हेही वाचा – Video : बँकेचा कॅशिअर इस्त्री आणि चिमटा घेऊन थेट बँकेत; कोरोनाविरोधात जुगाड


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -