घरताज्या घडामोडीदिलासादायक! पुण्यात ५४८ रूग्णांना घरी सोडले!

दिलासादायक! पुण्यात ५४८ रूग्णांना घरी सोडले!

Subscribe

गेले काही दिवस देशासह महाराष्ट्रात लोकांनी हॉस्पिटलमध्ये रांगा लावल्या आहेत. कारण करोनाच्या भितीने सारेस धास्तावले आहेत. साधा सर्दी, खोकला, ताप आलेल्यांनी करोनाची चाचणीकरण्यासाठी हॉस्पिटलेकडे धाव घेतली. पुण्यातही लोकांनी करोनाची चाचणी केली. आजपर्यंत पुण्यात सहाशेहून अधिक लोकांनी करोनाची चाचणी केली. आनंदाची बाब म्हणजे त्यातील ५४८ जाणांना घरी सोडण्यात आले आहे.

एकीकडे करोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, दुसरीकडे मात्र ५४८ रूग्णांना घरी सोडल्यामुळे काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. सध्या ५५ रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. त्यातील २८ जणांच्या नमुन्यांचे अहवाल अद्याप ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’कडून (एनआयव्ही) येणे बाकी आहे.

- Advertisement -

अहवालातून माहिती समोर

आरोग्य विभागाच्यावतीने पुण्यातील रूग्णांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला यावेळी ही दिलासा देणारी गोष्ट समोर आली. या अहवालात किती रूग्ण रूग्णालयात आहेत, किती जणांचे नमुने प्रलंबित आहे, किती रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. याची सर्व माहिती या अहवालात आहे. पुणे शहरात नायडू संसर्गजन्य रुग्णालय, पिंपरी-चिंचवडचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयात या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तिनही रूग्णालयात मिळून एकूण ६०३ रूग्ण दाखल आहे. पैकी नायडू रुग्णालयात ४६६ आणि वायसीएम रुग्णालयात १२१ तसेच औंध रुग्णालयात १६ रुग्णांना ठेवण्यात आले. त्यातील एकूण ५४८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. आजपर्यंत २ हजार ३९३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ८२१ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे.

लोकल बंद

कोव्हिड १९ चा इम्पॅक्ट म्हणून आता देशातील सर्व रेल्वे, मेट्रो, मोनोची प्रवासी वाहतूक थांबवण्याची निर्णय़ रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे मंत्री पियूष गोएल यांनीच हा महत्वपूर्ण असा निर्णय अखेर नाईलाजाने जाहीर केला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकारची प्रवासी रेल्वे वाहतूक बंद राहील असा निर्णय पियूष गोएल यांनी घेतला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची उपनगरीय लोकल वाहतूकही यामुळे बंद राहणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – करोना : देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक बंद, 3 हजार ट्रेन ३१ मार्च पर्यंत बंद राहणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -