घरCORONA UPDATEनियंत्रण कक्षात औषधांच्या तक्रारी कमी तर अन्न व पदार्थाचे दर वाढल्याचा तक्रारी...

नियंत्रण कक्षात औषधांच्या तक्रारी कमी तर अन्न व पदार्थाचे दर वाढल्याचा तक्रारी अधिक

Subscribe

सर्वसामान्यांना औषधांची उपलब्धता व्हावी यासाठी २४ मार्च रोजी अन्न आणि औषध प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली.

देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढता असताना राज्यात औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वसामान्यांना औषधांची उपलब्धता व्हावी यासाठी २४ मार्च रोजी अन्न आणि औषध प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली. या एफडीएच्या नियंत्रण कक्षात आतापर्यंत ८२ जणांनी संपर्क साधला असून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. दरम्यान, या नियंत्रण कक्षात अंदाजे २० जणांनी औषधासाठी संपर्क साधला असून इतर अन्न आणि पदार्थांच्या दरामध्ये वाढ झाल्याबाबतच्या तक्रारी येत असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

देशासह राज्यामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. अशा आपत्तीचा काही समाजकंटक फायदा उचलून मास्क आणि सॅनिटायझर चढ्या दराने विकत आहेत. तसेच  सर्वत्र मागणी वाढल्याने औषधाचा तुटवडा निर्माण  झाला आहे. शिवाय, या परिस्थितीत जनतेला सर्व आवश्यक औषधे नियमित उपलब्ध होणे आवश्यक आहे. औषध वितरण आणि उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते. पण, औषध वितरण नियमित ठेवणे आणि औषध उत्पादन सुरळीत सुरू ठेवणे यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी नागरिकांना औषधांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रार  करायची असेल  तर १८००२२२३६५-०२२-२६५९२३६२/६३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

पण, या नियंत्रण कक्षात राज्यभरातून रविवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ८२ जणांनी संपर्क साधला आहे.  त्यामध्येही अन्न आणि पदार्थाच्या दरामध्ये वाढ झाली असल्याच्या तक्रारी अधिक आहेत.  या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून औषध वितरण  व्यवस्थित ठेवणे तसेच औषधांच्या उत्पादनावरही लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून औषधासंदर्भातील तक्रारी कमी प्रमाणात येत असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -