घरमहाराष्ट्रमालपाणी उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाची धाड

मालपाणी उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाची धाड

Subscribe

गेल्या ७० वर्षांपासून गाय छाप तंबाखू विक्रीच्या व्यवसायात असणारा मालपाणी समूहाच्या मुख्य कार्यालयावर आयकर विभागाने मोठी धाड टाकली आहे. मालपाणी समूहाच्या तब्बल ३४ ठिकाणी आयकर विभागाने १७ डिसेंबरला ही छापेमारी केल्याचे समोर येत आहे. यात राज्यातील संगमनेर, पुणे, पाथर्डी यासह राज्यातील विविध ठिकाणी तीन दिवस हे छापासत्र सुरु होते. या उद्योगसमुहाच्या  243 कोटी रुपयांची बेहिशेबी तंबाखू विक्री केल्याची माहिती आयकर विभागाच्या औरंगाबाद टीमच्या कारवाई दरम्यान समोर आली. या समुहाच्या एक्सेल शीट आणि इतर कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली. याबरोबर बांधकाम क्षेत्रातही ४० कोटींच्या बेहिशोबी व्यवहार केल्याचे माहिती समोर आली आहे.

मालपाणी उद्योग समुहाने कोरोना दरम्यान ५० लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिले तर ५० लाख पंतप्रधान सहाय्यता निधीला दिले. तसेच राम मंदिर उभारणीसाठी मालपाणी समुहाने १ कोटींचा निधी दिला आहे. याशिवाय मालपाणी उद्योग समूहाच्या मालकीचे तंबाखू व्यवसायाव्यतिरिक्त शिर्डी वॉटर पार्क व लोणावळा येथे वॉटर पार्क व एमेझॉन पार्क सुरु आहेत. तर पुणे नाशिकमधील रियल इस्टेट व्यवसायातही मोठे गुंतवणुक आहे.


हेही वाचा- आली महागाई! रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -