घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"क्रांतीची आता ‘वांती’ झाली का?"; सीमाप्रश्नी राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“क्रांतीची आता ‘वांती’ झाली का?”; सीमाप्रश्नी राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Subscribe

नाशिक : स्वाभिमानाची भाषा करत तीन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष सोडून क्रांती घडवणार्‍या शिंदे सरकारचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचा घेतला. कर्नाटक सरकार महाराष्ट्राला आव्हान देत असताना महाराष्ट्राच्या सरकारने ‘चुल्लू भर पाणी में डूब जाना चाहियें’, अशा शब्दांत टिकास्त्र डागले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, त्याचबरोबर केंद्रिय मंत्री सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने महाराष्ट्राचा अपमान होत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गुजरातच्या एका सभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘रावण’ केला होता. त्यावरुन मोदींनी भरसभेत हा गुजरातचा अपमान असल्याचे सांगितले. तर, महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवमान हा संपूर्ण राज्याचा अपमान नाही का? यावरुन भाजपच्या विचारांचा फरक आपल्याला दिसून येतो. छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्‍या सरकारचा बदला घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, ज्येष्ठनेते दत्ता गायकवाड, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी आमदार वसंत गिते, उपनेते सुनील बागूल, माजी गटनेते विलास शिंदे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे आदी उपस्थित होते.
‘मेरा बाप चोर है’ ‘दिवार’ या चित्रपटात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असे गोंदले होते. त्याचप्रमाणे शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार, खासदारांना त्यांचे मुले, पत्नी आणि नातेवाईक गद्दारच म्हणतील. या नेत्यांची, आमदारांची सुरक्षा काढली तर खवळलेली जनता त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही खासदार राऊत यांनी दिला.

गोंडसेंचे करिअर संपले

नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांचा चेहरा (ओळख) नसताना आम्ही त्यांना उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. आता त्यांनी स्वत:ची राजकीय कबर खोदली असून, त्यांचे राजकीय करिअर संपले आहे, असा थेट आरोपच खासदार राऊत यांनी केला. तसेच, आमदास सुहास कांदे व पालकमंत्री दादा भुसे यांच्यातील वादाचा लवकरच विस्फोट होईल, असे भाकितही त्यांनी वर्तवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -