घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वायत्त विद्यापीठांचे 'कोटे' भरण्यासाठी अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया लांबवली का?

स्वायत्त विद्यापीठांचे ‘कोटे’ भरण्यासाठी अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया लांबवली का?

Subscribe

नाशिक : स्वायत्त विद्यापीठांशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रिया सुरुही केली असली तरी तंत्रशिक्षण संचनालयाशी संबंधित पारंपारिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरु झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह संबंधित महाविद्यालयांचे व्यवस्थापनही अस्वस्थ झाले आहे. स्वायत्त महाविद्यालयांतील प्रवेशाचे कोटे भरण्यासाठी तर सरकारचा विलंबाचा डाव नाही ना, अशी शंका आता महाविद्यालयांतून व्यक्त होत आहे.

इंजिनिअरिंग कॉलेजांचा दर्जा आयआयटीसारखा व्हावा या हेतूने सरकारने स्वायत्त महाविद्यालयांची रचना केली आहे. ही महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. मात्र, या महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता आहे. याअंतर्गत या महाविद्यालया अभ्यासक्रम स्वतंत्रपणे ठरवले जातात. विषयरचना करण्याचे स्वातंत्र्यही आहेे. परीक्षा, निकाल पद्धती, गुणांकन पद्धतीचे स्वातंत्र्य आहे. निकाल स्वतंत्रपणे जाहीर केले जातात. महाविद्यालयाचे नाव प्रमाणपत्रावर असते व प्रमाणपत्र विद्यापीठच आपल्या नावासह देते.

- Advertisement -

असे असले तरी यंदा पारंपारिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी असंख्य विद्यार्थी इच्छुक आहेत. त्यासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रियेबाबत चौकशी करत आहेत. मात्र, अद्याप अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरु झालेली नाही. त्याउलट स्वायत्त असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. पारंपारिक महाविद्यालयात आधीच मर्यादित जागा आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे प्रवेश मिळेल की नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडलेला आहे.

ही प्रवेश प्रक्रिया सुरु होत नसल्याने नाईलाजास्तव विद्यार्थी व पालकांनी स्वायत्ता महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे निश्चित केले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपये शैक्षणिक खर्च करावा लागत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक फटका बसत आहे. सरकारच जाणीवपूर्वक शासकीय अभियांत्रिकीसाठी प्रवेश सुरु करत नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. स्वायत्त महाविद्यालयांची भरभराट होत असली तरी पारंपारिक महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांचे मन:स्वास्थ्य बिघडत आहे, याकडेही शासनाने लक्ष द्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -