उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान – सुप्रिया सुळे

It is an insult to Maharashtra not to allow Deputy Chief Minister Ajit Pawar to speak, said Supriya Sule
सुप्रिया सुळे

देहूतल्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते झाला. कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीका केली.

सुप्रिया सुळेंची टीका – 

देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

कार्यक्रमावर भाजपची छाप –

देहूत आयोजित करण्यात आलेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमावर भाजपची छाप असल्याचे दिसून येत होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे स्टेजवर उपस्थित होते.

राजशिष्टाचार म्हणून अजित पवार उपस्थित –

या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतापासून या कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत अजित पवार उपस्थित होते.