घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभारत जोडोच्या यशस्वीतेमुळेच आवाज दाबला जातोय; राहूल गांधींना शिक्षा झाल्याचा कॉंग्रेसकडून निषेध

भारत जोडोच्या यशस्वीतेमुळेच आवाज दाबला जातोय; राहूल गांधींना शिक्षा झाल्याचा कॉंग्रेसकडून निषेध

Subscribe

नाशिक : मोदींविरोधात केेलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते राहूल गांधी यांना दोषी ठरवत सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तुर्तास त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी, भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेमुळे घाबरून जाऊन मोदी सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ गुरूवारी नाशिकमध्ये काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

सुरत कोर्टात काँग्रेस नेते राहूल गांधी जामीन मंजूर करण्यात आला परंतु या देशात लोकशाहीचा गळा गोटण्याचा काम मोदी सरकार करत आहे. देशात एकमेव राहुल गांधी असे नेते आहे जे मोदी सरकार विरोधात आवाज उठवत आहे व त्यांची जी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली त्याला घाबरून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे असे यावेळी अध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले. याचा विरोध करण्यासाठी नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा गांधी मार्गावरील पक्ष कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी अल्पसंख्यानक शहर अध्यक्ष हनिफ बशीर, सेवादलाचे शहर अध्यक्ष वसंत ठाकूर, माजी नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी, महिला शहर अध्यक्ष स्वाती जाधव, एनएसयुआय चे शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमश शेख, ओबीसी शहर अध्यक्ष गौरव सोनार,सचिव फारूक मन्सूरी, जावेद इब्राहिम, जुली डिसोझा, अनिल बहोत, कुसुम चव्हाण, समीना पठाण, साजिया शेख, अरुणा आहेर, सारिका कीर, महेरुणीसा शेख, जावेद मिर्झा, सागर वाहूळ, दाऊद अब्दुल गाणी शेख, दाऊद शेख, राजेंद्र हिवाडे, ज्ञानेश्वर काळे, इसाक कुरेशी, फारूक कुरेशी, सादिक मंन्सुरी, संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते मोठे संख्यानी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -