Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी टाटा कॅन्सर रुग्णालयाला बॉम्बे डाइंगमध्ये १०० खोल्या देण्यात येणार, जितेंद्र आव्हाड यांची...

टाटा कॅन्सर रुग्णालयाला बॉम्बे डाइंगमध्ये १०० खोल्या देण्यात येणार, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अवघ्या २४ तासात डॅमेज कंट्रोल, आव्हाडांनी केलं स्वागत

Related Story

- Advertisement -

टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या कँन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांच्या राहण्याच्या सोयीसाठी म्हाडाच्या १०० सदनिका देण्यात आल्या होत्या. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांचे वितरण राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने हा प्रकल्प करण्यात आला होता. मात्र स्थानिका आमदाराच्या तक्रारीमुळे या प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देत जितेंद्र आव्हाड यांना त्याच परिसरात नवीन जागा शोधण्याच्या सूचन दिल्या आहेत. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी बॉम्बे डाईंगमध्ये जागा शोधल्या असून तिथल्या जागा टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी, घरच्यांसाठी १०० सदनिका हाजी कासन चाळीमध्ये देण्यात आल्या होत्या. पण तिथल्या स्थानिकांनी आक्षेप घेतल्यामुळे आणि तो आक्षेप आपल्या आमदारांकडे नोंदवल्यामुळे आमदारांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्री मंडळ बैठकीपुर्वी आदेश दिला की आजच्या आज त्याच परिसरात जागा शोधा आणि ताबडतोब त्या द्या, लगेच शोध घेतल्यानंतर बॉम्बे डाइंगमध्ये जागा मिळाल्या आहेत. परंतु वरचा मजला आणि खालचा मजला असं न करता एकत्रित १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयांना देता येतील असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्णय दिला असून त्याचे स्वागत करतो असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारमध्ये नाराजी नाही

- Advertisement -

स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिली परंतु म्हाडाच्या सचिवांना आणि सर्वांना पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. जागा मिळाल्यावर निर्णय घेऊन टाकण्याचे आदेशही दिले आहेत. नाराजी असतील तर एवढ्या जलद काम झाली नसती अस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. वैयक्तिक रागामुळे तक्रार करण्यात आली का असा प्रश्न करण्यात आला असता उत्तर देताना राज्यातील २८८ आमदारांपैकी माझ्यावर वैयक्तिक राग असणारा एकही आमदार नाही असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी दखल घेतली नाही

शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे जितेंद्र आव्हाड याच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्का बसाल आहे. अजय चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असून जितेंद्र आव्हाड यांनी भेटीची वेळ दिली नसल्याचा आरोप केला आहे. कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी जागा दिल्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. यामुळे स्थानिक रहिवाशी आणि महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी भेटीची वेळ मागितली. त्यांच्याही पीएला भेटलो पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईपर्यंत आव्हाड यांनी दखल घेतली नाही असा आरोप अजय चौधरी यांनी केला आहे.

- Advertisement -