Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी करुणा शर्मा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

करुणा शर्मा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Related Story

- Advertisement -

करुणा शर्मा यांना काही वेळापूर्वी अंबाजोगाई कोर्टात हजर करण्यात आले. आता अंबाजोगाई कोर्टाची सुनावणी झाली असून करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच चालक अरुण मोरेला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अॅट्रॉसिटीसंदर्भात ही सुनावणी पार पडली आहे. काल, रविवारी परळी पोलिसांकडून करुणा शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे पोलिसांनी करुणा शर्मा यांच्यावर कारवाई केली आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात केला होता. आज याप्रकरणी अंबाजोगाईच्या सेशन कोर्टात सुनावणी झाली.

नक्की काय घडले?

करुणा शर्मा यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात काही पुरावे सादर करू असे सांगितले होते. जशा त्या रविवारी परळीत दाखल झाल्या तसं त्यांच्या गाडीला महिलांनी घेराव घातला. याच दरम्यान करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल सापडले. यावेळी करुणा शर्मा यांची अडवणूक करण्यात आली. गाडीत पिस्तुल साडपल्यामुळे एकच खळबळ उडाली. मग गाडीत पिस्तुल सापडल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना अटक केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान गाडीत सापडलेले पिस्तुल माझे नसून, मला अडचणीत आणण्याकरिता जाणीवपूर्वक पिस्तुल गाडीत ठेवण्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. रविवारी जेव्हा करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या, तेव्हा महिलांनी धनंजय मुंडे यांची बदनामी का करत आहात, असा जाब विचारला. यादरम्यान महिला आणि शर्मा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी दोन महिलांनी करुणा शर्मा यांच्यावर मारहाण करण्याचा परळी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी करुणा शर्मा यांच्यासह दोघांविरुद्ध परळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेला एक व्यक्ती गर्दीतून गाडीच्या मागील बाजूस काहीतरी टाकत असल्याचे समोर आले आहे. यामुळे याप्रकरणातील गुंतागूंत वाढताना दिसत आहे.


हेही वाचा – करुणा शर्मा पिस्तुल प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस


- Advertisement -

 

- Advertisement -