घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्यांना अधिकाऱ्यांनी दिला मंत्रालयात प्रवेश, गोपनीय फाईलींची केली छाननी

किरीट सोमय्यांना अधिकाऱ्यांनी दिला मंत्रालयात प्रवेश, गोपनीय फाईलींची केली छाननी

Subscribe

राज्य सरकारकडूनही ४ जानेवारी रोजी लोकायुक्तांपुढील सुनवाणीत दंड आणि त्यावरील व्याज माफ करता येणार नाही असे सांगितले होते. मात्र अर्थ विभागाचा विरोध डावलून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्यात आला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करण्यामुळे नेहमी चर्चेत असता. सोमय्यांनी आतापार्यंत मंत्र्यांचे आणि आमदारांवर घोटाळ्याच आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जमीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. सोमय्यांना घोटाळ्यांची माहिती कुठून मिळते हा संशोधनाचा विषय आहे. परंतु मंत्रालयात जाऊन नगर विकास खात्यातील कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून सोमय्यांनी फाईल्स बघितल्या आहेत. कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून असतानाचा सोमय्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोमय्यांना अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाण्याची परवानगी दिली असल्याचे देखील सांगितले जात आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना अधिकाऱ्यांनी मंत्रालयात प्रवेश दिला होता. आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीचा कोट्यावधींचा दंड राज्य मंत्रिमंडळाने माफ केला आहे. यावरुन सोमय्यांनी हल्लाबोल केला आहे. सरनाईकांच्या इमारतीबाबतची माहिती घेण्यासाठी सोमय्या मंत्रालयात गेले होते का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सोमय्या मंत्रालयात नगर विकास खात्यात गेले होते. नगर विकास खात्यात कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले असल्याचे व्हायरल फोटोमध्ये दिसते आहे. सोमय्यांच्या बाजूला अधिकारी उभे असल्याचे फोटोत दिसत आहे. यामुळे किरीट सोमय्या अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून नेमकं काय करत होते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोमय्या खुर्चीत बसून फाईल्सची छाननी करत होते असे सगळ्यांना वाटत आहे.

- Advertisement -

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा ३ कोटी रुपयांचा दंड माफ केल्यावरुन राज्य सरकारविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे. राज्य सरकारने प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा २०१३ पासूनचा ३ कोटी ३३ लाख ९६ हजारांचा दंड माफ केला आहे. यावर १८ टक्के व्याज देखील लागू आहे. अशा प्रकारे राज्य सरकारने आमदार प्रताप सरनाईक यांचा १८ कोटी रुपयांचा दंड आणि कर माफ केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

इमारतीचा दंड माफ करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला अर्ज केला होता. अर्थ खात्याकडून दंड माफ करण्यासाठी विरोध करण्यात आला होता. तसेच नगरविकास खात्याकडूनही दंड माफ करण्याचस विरोध करण्यात आला होता. राज्य सरकारकडूनही ४ जानेवारी रोजी लोकायुक्तांपुढील सुनवाणीत दंड आणि त्यावरील व्याज माफ करता येणार नाही असे सांगितले होते. मात्र अर्थ विभागाचा विरोध डावलून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्यात आला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजप युती करुन खच्चीकरण करतो हे शिवसेनेला कळल होतं, नवाब मलिकांचे वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -