घरताज्या घडामोडीKirit somaiya korlai : किरीट सोमय्या कोर्लईत दाखल, ग्रामपंचायतीच्या समोरच भाजप शिवसेनेची...

Kirit somaiya korlai : किरीट सोमय्या कोर्लईत दाखल, ग्रामपंचायतीच्या समोरच भाजप शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी

Subscribe

मुंबईहून निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचायतीत किरीट सोमय्या दुपारी १.३० वाजता दाखल झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीत माहिती घेण्यासाठी ते कार्यालयात गेले. पण त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही कार्यालयात गेल्याने शिवसैनिकांनी आक्षेप घेतला. किरीट सोमय्यांसोबत कार्यकर्ते असल्यामुळे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणता घोषणाबाजी केली. पण शिवसैनिकांनी आक्षेप घेतल्यानेच ग्रामपंचायत कार्यालयातून भाजप कार्यकर्त्यांना बाहेर काढले. अवघ्या २० मिनिटातच किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीतून बाहेर पडले. किरीट सोमय्यांनी १८ बंगले गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीकडून माहिती घेण्यासाठी हा दौरा केला. याआधी संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना बंगले कुठे आहेत ? असे आव्हान पत्रकार परिषद घेऊन दिले होते.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यानेच किरीट सोमय्यांना आटोपते घ्यावे लागले. कोर्लई ग्रामपंचायतीच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून स्वच्छताही करण्यात आले. दोन्ही पक्षाचे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले कार्यकर्ते पाहता अलिबाग पोलिसांकडून याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता पोलिसांनीच सोमय्यांना आटोपते घ्यायला सांगितले.

- Advertisement -

किरीट सोमय्या कोर्लई गावात दाखल होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. कार्यकर्त्यांना जाणून बुझून घेऊन किरीट सोमय्या आल्याचे आरोप शिवसैनिकांनी केला. याठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोन्ही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली. पण वाढती तणावाची परिस्थिती पाहता किरीट सोमय्या यांनी काढता पाय घेतला. माहितीच्या अधिकारात जितकी माहिती द्यायची होती, तितकी माहिती दिली असल्याचे स्पष्टीकरण सरपंचांनी दिले. गावाला बदनाम करण्यासाठी आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी कार्यकर्त्यांसह किरीट सोमय्या आल्याचा आरोपही सरपंच प्रशांत मिसाळ केला. माहितीच्या अधिकारात माहिती दिली होती, पण चुकीचे काय असेल तर सांगायला हवे होते. त्यानंतर ग्रामपंचायतीची गोमूत्र वापरून स्वच्छताही करण्यात आली.

किरीट सोमय्या कार्यकर्ते घेऊन येणार आहेत कळाल्यानेच शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात दाखल झाले असल्याची माहितीही सरपंचांनी दिली. किरीट सोमय्यांसोबत भाजपचे कार्यकर्ते आत आल्यानेच शिवसैनिकांनी या गोष्टीला आक्षेप घेतला. तसेच किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीचा भेट दिल्यानंतर ते रेवदांडा पोलीस स्थानकात जाणार आहेत. रेवदांडा पोलीस स्थानकात १९ बंगले चोरीला गेल्याची तक्रार देणार आहेत. तसेच मालमत्तांच्या ठिकाणीही ते पाहणी करणार असल्याचे कळते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -