घरताज्या घडामोडीअमृता फडणवीसांना आवरा; सेनेचे संघाला पत्र

अमृता फडणवीसांना आवरा; सेनेचे संघाला पत्र

Subscribe

राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीसांना आवरा, असं किशोर तिवारींनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांना भाजप हा पक्ष स्वत:च्या ताब्यात घ्यायचा आहे का? असा सवाल पत्रात केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी शिवसेनेवर बांगड्या घातल्या आहेत का, अशी टीका केली होती. यावर शिवसेना नेते आमि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांनी माफी मागावी असे म्हटले होते. त्यानंतर देवेंद्र फडवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्तर देत टीका केली आहे. यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा, असे पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिले आहे.

पत्रात काय लिहिलं आहे?

  • देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनाही राजकीय आगपाखड करण्यापासून आवर घाला.
  • देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस जी टीका करत आहेत त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत, त्यामुळे पुन्हा जवळ येणे आणखी कठीण होत आहे.
  • निवडणूक निकालानंतर जी युती होऊ शकली नाही आणि भाजपला सरकार बाहेर जावे लागले हे देवेंद्र फडणवीस यांच्या अरेरावीमुळे झाले आहे. देवेंद्र फडणवीसांना त्यांचा अतिआत्मविश्वास नडला.
  • अमृता फडणवीस यांनी केलेले हे ट्विट अशोभनीय आहे. भारतीय संस्कृतीमधील पती आणि पत्नीच्या संस्कृतीला धक्का देणारे आहे.
  • अमृता फडणवीस यांना भाजप हा पक्ष स्वत:च्या ताब्यात घ्यायचा आहे का?
  • अमित शाह, नितीन गडकरी यांच्या पत्नी कुणावरही टीका करत नाहीत.
  • सीतेने रावणाला शिव्या दिल्याचे ऐकिवात नाही. जे काही केले ते राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी केले.
  • अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे भाजपला २०२४ मध्ये नुकसान होऊ शकते.

नेमकं प्रकरण काय आहे?

एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीस यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. आझाद मैदानात मंगळवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षाने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, अशी टीका केली होती. यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत बांगड्या भरल्या आहेत का? हे वक्तव्य मागे घ्या असे म्हटले होते. त्यानंतर देवेंद्र फडवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्तर देत टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखे आहे तुमचे आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असे ट्विट अमृता यांनी केले होते.

- Advertisement -


हेही वाचा – प्रेमविवाह न करण्याची शपथ देणारे तीन प्राध्यापक निलंबित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -