घरताज्या घडामोडीमैदान हे मैदानच राहिलं पाहीजे, RRS च्या 'त्या' पत्रावर किशोरी पेडणेकरांनी दिली...

मैदान हे मैदानच राहिलं पाहीजे, RRS च्या ‘त्या’ पत्रावर किशोरी पेडणेकरांनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अडचण होत आहे. संघाच्या दादर शाखेने शिवाजी पार्क येथे शाखा भरवण्यासाठी वेगळा भूखंड देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. स्मृतीस्थळाच्या वाढत्या व्याप्तीमुळे संघाला शाखा भरवणे अशक्य होत असल्याचा दावा संघाच्या दादर शाखेने केला आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महापालिकेला पत्र देखील लिहिलं आहे. दरम्यान, मुळात हे पत्र आल्याचं मला माहिती नाहीये. सगळ्या गोष्टींनी मैदान भरून गेलं आहे. मैदानामध्ये मैदान बचाव करणाऱ्या संघटना आहे. महापालिकेला आलेलं पत्र मी समजून घेईन. त्यावर महापालिकेची नियमावली काय आहे. यावर चर्चा करण्यात येईल. परंतु मैदान हे मैदानच राहिलं पाहीजे, असं माझं मत आहे, असं माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, शिवाजी पार्कच्या मैदानावर बाळासाहेबांची सभा भरायची. छत्रपती शिवाजी महाराजांची सभा भरते. त्यामुळे १९३६ पासून हे करतायत का?, हे येथील लोकं किंवा महापालिका सांगेल. त्यामुळे मी महापालिकेशी संपर्क करत आहे. महापालिकेच्या माध्यमातून मला जे कळेल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान राहीलं पाहीजे, असं येथील लोकांचं मत आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, जे शिवाजी पार्कमध्ये राहतायत. त्यांची आणि महापालिकेची चर्चा होणं महत्त्वाचं आहे. तसेच शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान म्हणजे खेळाचं राहिलं पाहीजे. यासंदर्भात मी महापालिकेकडून माहिती घेऊन बोलेन, असं पेडणेकर म्हणाल्या.

राजकीय आखाडे तयार होताना दिसत आहेत. त्यामुळे नियमात काय असेल ते बघून आम्ही पुढील निर्णय घेऊ. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पूर्वी मैदान वाचावं अशी भूमिका घेतली होती. तसंच आताही राज ठाकरे घेतील, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

शिवाजी पार्क मैदानातील मोकळ्या भूखंडावर १९३६ पासून संघाची शाखा भरवली जात होती. त्यानंतर १९६७ मध्ये संघाने या भूखंडाचे नियमितपणे भाडे भरले आहे. या भूखंडासाठी संघाने २००७ पर्यंत भाडे भरले आहे. मात्र, महापालिकेने जमिनीचे आरेखन न केल्याने २००८ पासूनचे भाडे थकले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच हा भूखंड १७५५ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाचा आहे. भूखंडाला लागून बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे, असा दावा संघाकडून करण्यात आला आहे.


हेही वाचा : Suresh Raina : शास्त्रींनी मीटिंग बोलावल्यानंतर सुरेश रैनाला झाले अश्रू अनावर.., अक्षर पटेलचा मोठा खुलासा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -