घरताज्या घडामोडीएनएसई घोटाळ्याशी संजय पांडेंचा काय संबंध?, वाचा सविस्तर

एनएसई घोटाळ्याशी संजय पांडेंचा काय संबंध?, वाचा सविस्तर

Subscribe

एनएसई घोटाळाप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे.

एनएसई घोटाळाप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. मात्र, निवृत्तीनंतर अचानक संजय पांडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर कसे आले याबाबत सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तर नेमका एनएसई घोटाळा काय आहे आणि या घोटाळ्याशी संजय पांडे यांचा संबंध कसा हे हे आपण जाणून घेऊयात. (know relation between sanjay pandey and nse scam in marathi)

एनएसई घोटाळ्यातील आरोपी चित्रा रामकृष्णन यांनी संजय पांडे यांना एनएसईशी संबंधितांचे फोन रेकॉर्ड करण्यात सांगितलं असा आरोप होत आहे. एनएसई घोटाळा प्रकरणी एनएसईच्या माजी कार्यकारी संचालिका चित्रा रामकृष्ण, रवी नारायण व इतर सात जणांवर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

सीबीआयच्या दाव्यानुसार, 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईमध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. त्यावेळी एका आयटी कंपनीला एनएसईची सुरक्षा ऑडिट आणि लीगल कन्सल्टन्सीसाठी काम देण्यात आले होते. ही आयटी कंपनी संजय पांडे यांच्या पत्नीच्या मालकीची आहे. ही कंपनी संजय पांडे यांनी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता, त्यानंतर सुरू केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – CBIकडून संजय पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, घरावर छापे

मात्र, त्यावेळी राजीनामा मंजूर न झाल्याने त्यांना पुन्हा भारतीय पोलीस सेवेत दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर या कंपनीची मालकी हक्क पांडे यांच्या कुटुंबीयांकडे होती. याच कंपनीच्या माध्यमातून चित्रा रामकृष्ण यांच्या सांगण्यावरून एनएसईमधील मोठ्या अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याची माहिती तपासात समोर आली. याचप्रकरणी त्यांच्या विरोधात सीबीआयने 3 गुन्हे दाखल केले असून ईडीनेही 2 गुन्हे दाखल केले आहेत.

फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे यांच्या आयटी कंपनीने इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे. या मशिनच्या माध्यमातून एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन टॅंपिंग करत होते. फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी NSE प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात होती. त्या फोन टॅपिंगसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे पुरावे तपासात सीबीआय आणि ईडीला मिळाले. विशेष म्हणजे संजय पांडे यांच्या कंपनीला NSE कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्याच्या बदल्यात 4 कोटी 45 लाख मिळाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वीच एनएसई घोटाळाप्रकरणी संजय पांडे यांची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआयने संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगडमधल्या घरी छापेमारी केली. त्यानुसार, मुंबईत जवळपास ९ ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे.


हेही वाचा – नगराध्यक्ष, सरपंचपदासाठी थेट निवडणूक घ्या, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -