घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह राष्ट्रवादील धक्का; कोल्हापूर दौऱ्यात झाले पक्षप्रवेश

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह राष्ट्रवादील धक्का; कोल्हापूर दौऱ्यात झाले पक्षप्रवेश

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे व ठाकरे गटात वाद सुरु झाले आहेत. शिवसेना शाखांपासून विधिमंडळ कार्यालय, पालिकेचे कार्यालय यावर शिंदे समर्थकांनी दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर येथील गंगावेश येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. भव्य पुष्पहार मुख्यमंत्री शिंदे यांना घालण्यात आला. त्यावेळी त्यांच्या हातात धनुष्यबाणही देण्यात आले.

 

कोल्हापूरः करवीरचे ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि इचलकरंजीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात हा पक्षप्रवेश झाला आहे. पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता कांबळे, शहर सरचिटणीस बाजीराव कुंभार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात हे पक्षप्रवेश झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे व ठाकरे गटात वाद सुरु झाले आहेत. शिवसेना शाखांपासून विधिमंडळ कार्यालय, पालिकेचे कार्यालय यावर शिंदे समर्थकांनी दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर येथील गंगावेश येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. भव्य पुष्पहार मुख्यमंत्री शिंदे यांना घालण्यात आला. त्यावेळी त्यांच्या हातात धनुष्यबाणही देण्यात आले. या जंगी स्वागतात राष्ट्रवादी कॉंग्रेस व ठाकरे गटाच्या समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे.

प्रकाश पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोनवेळा इचलकरंजी पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गेली आठ वर्षे ते शहराध्यक्ष आहेत. काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळीच त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याचे सोशल मीडियातून जाहिर केले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पाटील हे राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक होते. तेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हेरवाड ग्राम पंचायत सदस्या छाया सुर्यवंशी, ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख माधुरी साखरे, कनवाडच्या ग्राम पंचायत सदस्या आसमा पटेल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

चंद्रदीप नरके हे ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जात होते. मात्र त्यांनीही ठाकरे गटाला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नरके हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतालाही हजर होते.  सध्या शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे हे सांगण्याची गरज नाही. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची माझी तयारी सुरू आहे. गेल्या निवडणुकीत हरल्यानंतर पाचव्या दिवशी मी पुन्हा कामाला लागलो आहे, असे चंद्रदीप नरके यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -