घरमहाराष्ट्रसंत गजानन महाराजांच्या 145 व्या प्रकट दिनानिमित्त शेगावात लाखो भाविक उपस्थित

संत गजानन महाराजांच्या 145 व्या प्रकट दिनानिमित्त शेगावात लाखो भाविक उपस्थित

Subscribe

श्री संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन आहे. यानिमित्ताने बुलढाण्यामधील शेगावात लाखो भक्त उपस्थित झाले आहेत. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या सप्तमी तिथीला संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. गजानन महाराज महाराष्ट्रातील एक संत होते. खरं तर, शेगाव गजानन महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे ठाऊक नाही. मात्र, ते पहिल्यांदा ते माघ महिन्यातील वद्य सप्तमी दिवशी शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी सर्वप्रथम प्रकट झाले होते. असं म्हटलं जातं.

शेगावमध्ये त्यांनी आपलं जीवन शेगाववासियांच्या सहवासात घालवलं. ‘गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो.

- Advertisement -

श्रीसंत गजानन महाराजांचा 141वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

श्री संत गजानन महाराज 1878 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी शेगाव येथे प्रकट झाले होते. त्याठिकाणी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेगाववासियंच्या सानिध्यात घालवले.

- Advertisement -

Sant Gajanan Maharaj 145 Prakat Din Today Thousads Of Devotees Gathers In Shegaon  Buldhana | Gajanan Maharaj Prakat Din 2023 : संत गजानन महाराज यांचा आज 145  वा प्रकट दिन, शेगावात भक्तांची मांदियाळी

आज राज्यभरातील तसेच मध्य प्रदेशातील आणि गुजरातमधूनही जवळपास एक हजारांपेक्षा जास्त दिंड्यासह लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून आरतीने सर्व कार्यक्रमांची सुरुवात झाली. तसेच आज दिवसभर शेगावात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असणार आहेत. तसेच या दिवशी श्री गजानन महाराजांच्या पादुकांचे पूजन आणि मंदिरातून पालखी काढली जाते. लाखो भाविक या ठिकाणी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आज उपस्थित राहतात.
शेगावासोबतच राज्यातील विविध भागांमध्ये देखील आज श्री संत गजानन महाराजांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

 


हेही वाचा :

राज्यपाल गोल्डन गँगमधील सदस्य, त्यांचं काम लवकरच कळेल; संजय राऊतांचा निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -