घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं शिवाजी पार्कवर स्मारक उभारा ;...

Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं शिवाजी पार्कवर स्मारक उभारा ; भाजपाची मागणी

Subscribe

काल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज मंडळी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. दरम्यान, शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मृतिस्थळ उभारावं, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची वयाच्या 93व्या वर्षी प्राणज्योत मालवली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कवर काल 6 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज मंडळी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. दरम्यान, शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मृतिस्थळ उभारावं, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

- Advertisement -

‘भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात मुंबईतील शिवाजी पार्क दादर येथे अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यामुळे याच जागेवरती शिवाजी पार्कात गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारवे आणि त्यांच्या स्मृती कायमस्वरुपात जतन कराव्यात असे, जगभरातील कोट्यावधी संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने मी ही विनंती करत असल्याचे, राम कदम यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 

राज्यात आज सार्वजनिक सुट्टी

ठाकरे सरकारने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवार 7 फेब्रुवारीला एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. विशेष म्हणजे सर्व बंद असले तरी शेअर बाजार आज खुला राहणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल मुंबई उच्च न्यायालयही आपल्या सर्व खंडपीठांवरील सर्व न्यायालयीन कामकाज 7 फेब्रुवारीला म्हणजेच आज स्थगित करणार आहे. महाराष्ट्र, दक्षिण आणि उत्तर गोवा, दादरा, नगर हवेली आणि दीव, दमण आणि सिल्वासा येथील दुय्यम न्यायालये सोमवारी बंद राहणार आहेत. राज्यभरातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आज बंद ठेवण्यात येणार आहेत. पण केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरू राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


हे ही वाचा – Lata Mangeshkar Passes Away: तुम मुझे यूँ भुला ना पाओगे… गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे देहावसान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -