घरमहाराष्ट्रLok Sabha : नितीन गडकरींकडून आचारसंहितेचा पुन्हा भंग; गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची...

Lok Sabha : नितीन गडकरींकडून आचारसंहितेचा पुन्हा भंग; गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

Subscribe

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाचे पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

नागपूर : भारतीय जनता पक्ष कायदा धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भाजपाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी यांनी याआधी शाळकरी मुलांचा प्रचार रॅलीत सहभाग केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाचे पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने गडकरी यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024 Congress accuses Nitin Gadkari of violating code of conduct again)

नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून धार्मिक मतदारांचे ध्रुवीकरण करणारा आहे. भाजपाने या पोस्टर्सचा वापर काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी केला  आहे. भाजपा आणि  नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणूक आयोगाने तत्काळ त्यांची उमेदवारी रद्द करून भाजपावर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात केली आहे.

- Advertisement -

नियम धुडकावत असताना निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी वापरत असलेल्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. पण ते भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते. यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून आयोग दूर पळत असल्याचा आरोप करत केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का? असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

गडकरींकडून आचारसंहितेचा पुन्हा भंग (Another breach of code of conduct by Gadkari)

दरम्यान, निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी 1 एप्रिल रोजी शाळकरी मुलांचा वापर केला होता. एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केले होते. हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला होता.

- Advertisement -

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -