घरमहाराष्ट्रKailas Patil : ओमराजे निंबाळकरांच्या सभेत कैलास पाटलांना उष्माघाताचा त्रास; रुग्णालयात उपचार...

Kailas Patil : ओमराजे निंबाळकरांच्या सभेत कैलास पाटलांना उष्माघाताचा त्रास; रुग्णालयात उपचार सुरू

Subscribe

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेदरम्यान आमदार कैलास पाटील उष्माघाताच्या त्रासामुळे चक्कर आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धाराशीव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम सुरू असून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. त्यात ऐन उन्हाळ्यात निवडणुका आल्यामुळे उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना प्रचार करताना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीत निवडून येण्यासाठी भर उन्हात नेत्यांच्या सभाही होताना दिसत आहे. आज धाराशीवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांच्या सभेदरम्यान आमदार कैलास पाटील उष्माघाताच्या त्रासामुळे चक्कर आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. (Lok Sabha Election 2024 Dharashiv Constituency Kailas Patil suffering from heatstroke in Omraje Nimbalkars meeting)

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राजकीय नेत्यांना प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे कडाक्याचं ऊन तर दुसरीकडे नेत्यांच्या प्रचारामुळे राज्यात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. पण आता उष्णतेच्या लाटेचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसू लागला आहे. कैलास पाटील यांना प्रचारसभेत चक्कर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : वडीलधाऱ्यांना म्हणा सासूचे चार दिवस संपले आता…; अजितदादांचा शरद पवारांना टोला

धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर हे आज उमेदवारी अर्ज भरणार होते. त्यामुळे त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख उपस्थित होते. यावेळी सभा सुरू असतानाच कैलास पाटील यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले. कैलास पाटील यांना उष्णाघाताचा त्रास झाल्यामुळे त्यांना चक्कर आली. यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना गाडीतून रुग्णालयात नेलं. कैलास पाटील यांना रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : पंतप्रधानांमुळे भाजपाच्या उमेदवारांकडून संविधान बदलाची उघडपणे वाश्चता; शरद पवार गटाची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -