घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : खूप केले नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी..., शांतीगिरी महाराज...

Lok Sabha 2024 : खूप केले नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी…, शांतीगिरी महाराज नाशकातून अपक्ष लढणार

Subscribe

महायुतीत नाशिक लोकसभेवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता नाशिक लोकसभेतून स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रात विदर्भातील पाच लोकसभांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्यापही सरकारचा म्हणजेच महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महायुतीत नाशिक लोकसभेवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता नाशिक लोकसभेतून स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. खूप केले नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी…, तरुणांचा आवाज शांतीगिरी महाराज अशा आशयाचे फलक घेऊन आज मंगळवारी (ता. 16 एप्रिल) नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. (Lok Sabha Election 2024 Swami Shantigiri Maharaj will fight independently from Nashik Constituency)

नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. सुरुवातील महाराजांनी महायुतीकडूनच नाशिक लोकसभेतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. परंतु, त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने, शांतीगिरी महाराजांकडून महाविकास आघाडीचा पर्याय उपलब्ध होतो का, हे पाहिले गेले. पण तिथेही हाती निराशाच आल्याने महाराजांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha : पंतप्रधानांमुळे भाजपाच्या उमेदवारांकडून संविधान बदलाची उघडपणे वाश्चता; शरद पवार गटाची टीका

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी स्वामी शांतीगिरी महाराजांनी आठ दिवसांचे अनुष्ठान केले. त्यानंतर आज या अनुष्ठानाची सांगता त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात आली. यावेळी शांतीगिरी महाराजांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. सकाळी त्र्यंबकेश्वर शहरातून हजारो भक्त परिवाराच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या तालावर आणि हातात भगवे झेंडे घेत यात्रा काढण्यात आली. यावेळी भक्तांच्या हाती ‘आता लढायचे आणि जिंकायचे’, ‘खूप केले नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी’ अशा आशयाचे फलक बघायला मिळाले. या फलकाची आता नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

- Advertisement -

कोण आहेत शांतिगिरी महाराज?

शांतिगिरी महाराज हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील आहेत. ते वेरुळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात दाखल झाले. येथेच त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर ते मठाधिपती झाले. या मठाची कोट्यवधींची संपत्ती आहे. देशात 55 हून अधिक मठ आहेत. काही ठिकाणी गुरुकूल आहेत. या मठाकडे शेकडो एकर जमीन आहेत. अनेक एसयुव्ही कार आहेत. शांतिगिरी महाराजांचा छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे.

हेही वाचा… Lok Sabha : वडीलधाऱ्यांना म्हणा सासूचे चार दिवस संपले आता…; अजितदादांचा शरद पवारांना टोला


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -