घरमहाराष्ट्रLok Sabha : पंतप्रधानांमुळे भाजपा उमेदवारांकडून संविधान बदलाची उघड वाच्यता; शरद पवार...

Lok Sabha : पंतप्रधानांमुळे भाजपा उमेदवारांकडून संविधान बदलाची उघड वाच्यता; शरद पवार गटाची टीका

Subscribe

संविधान बदलाची भाजपाच्या उमेदवारांकडून उघडपणे वाश्चता होत असल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने दोन दिवसांपूर्वीच त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. संकल्पपत्र असे भाजपाच्या जाहीरनाम्याचे नाव असून पक्षाने गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच वन नेशन, वन इलेक्शन अंतर्गत कॉमन इलेक्टोरल रोलची व्यवस्था करणार असल्याचेही भाजपाने म्हटले आहे. मात्र वन नेशन, वन इलेक्शनवरून विरोधकांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना आणि काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही ट्वीट करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहेत. (Lok Sabha Election 2024 Due to the Prime Minister BJP candidates have openly promised to change the constitution Sharad Pawar group Criticism)

पंतप्रधानांनी भाजपाच्या उमेदवारांना संविधान बदलाचा इतका दृढ विश्वास दिलेला वाटतोय की, उमेदवार उघडपणे यावर वाच्यता करत आहेत. सर्वधर्मसमभाव असलेल्या भारत देशात भाजपाच्या अशा छुप्या आणि चुकीच्या नीतीमुळे लोकांना मोठ्या संकटात लोटण्याची वेळ येईल. संविधान बदलाची भाषा 4 वरून 400 झाली तर देशात हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही. ही देशवासियांसाठी संकटाची घंटा आहे.

- Advertisement -

सुषमा अंधारेंचे भाजपावर टीकास्त्र (Sushma Andhare’s criticism of BJP)

दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा व्हिडीओ ट्वीट करताना म्हटले होते की, भाजपाच्या जे पोटात तेच ओठात आहे. भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्राच्या नावाखाली “वन नेशन वन इलेक्शनची” घोषणा ही सरळसरळ भारतीय संविधान बदलण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात पंकजा मुंडे म्हणताना दिसतात की, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, तर लोकसभेची, संसदेची निवडणूक आहे. या देशाची राज्यघटना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तसं बिल आणून काही नवीन नियम आणायची आहे. यासाठी मोठा माणूस तिथे गेला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.

- Advertisement -

काय म्हणाले विजय वडेट्टीवार? (Vijay Wadettiwar)

दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही भाजपावर निशाणा साधला होता. त्यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आंबेडकर स्वतः आले तरी ते संविधान बदलू शकत नाहीत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपाचे अयोध्येतील विद्यमान खासदार लल्लू सिंह उघडपणे सांगत आहेत की, भाजपाला संविधान बदलायचे आहे. म्हणून त्यांना 400 जागा जिंकायच्या आहेत. यावेळी त्यांनी लल्लू सिंह यांचा व्हिडीओही पोस्ट केला होता. त्यात लल्लू सिंह बोलताना दिसतात की, घटना दुरूस्ती करावी लागेल आणि खूप काम करावे लागेल. 272 जागांमध्ये सरकार बनू शकते, पण 272 जागांचे सरकार घटनादुरुस्ती करू शकत नाही. नवीन संविधान बनवायचे असेल तर त्यासाठी दोनपेक्षा जास्त तृतियांश बहुमताच्या जागा आवश्यक आहेत, असे लल्लू सिंह यांनी म्हटले होते.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -