घरमहाराष्ट्रLok Sabha : बारामती मतदारसंघात नवा ट्विस्ट; रोहित पवारांच्या मातोश्रींनी घेतला उमेदवारी...

Lok Sabha : बारामती मतदारसंघात नवा ट्विस्ट; रोहित पवारांच्या मातोश्रींनी घेतला उमेदवारी अर्ज

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज घेतला आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात (7 मे) होणाऱ्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र येथील मतदारसंघ निवडणुकीआधीच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. कारण याठिकाणी पवार विरुद्ध पवार आणि नणंद -भावजय अशी लढत होत आहे. मात्र आता बारामती लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. (Lok Sabha Election 2024 MLA Rohit Pawars mother Sunanda Pawar filed nomination form from Baramati Constituency)

बारामतीत पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकमेकांविरुद्ध निवडणूक लढत असल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्यात लढत आहेत. मध्यतरी शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे हे सुद्धा याठिकाणी निवडणूक लढण्यासी उत्सुक होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. तसेच सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : पंतप्रधानांमुळे भाजपाच्या उमेदवारांकडून संविधान बदलाची उघडपणे वाश्चता; शरद पवार गटाची टीका

अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शालिनी पवार यांच्यासह इतर नातेवाईक अजित पवारांविरोधात प्रचार करताना दिसत आहे. असे असतानाच आता रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्यासाठी शरद पवार गटाने अर्ज घेतला आहे. सुप्रिया सुळेंचा अर्ज बाद झाला तर खबरदारी म्हणून सुनंदा पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे. तसेच अजित पवार यांनीही बारामती मतदारसंघातून डमी अर्ज घेतला होता. दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघातून उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत नागरिक संभ्रमात सापडले आहे.

- Advertisement -

अजित पवार स्वत: निवडणूक लढवतील – रोहित पवार (Ajit Pawar will contest election himself – Rohit Pawar)

दरम्यान, अजित पवारांच्या डमी उमेदवारी अर्जावरून टीका करताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीवरून आदेश आला तर अजित पवार काहीही करतील. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अजित पवार स्वत: आदेश द्यायचे. पण आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो आहे. उद्या जर दिल्लीवरून आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि सुनेत्रा पवार यांचा अर्ज मागे घ्या, तर अजित पवारांना ते मनाविरुद्ध असलं तरी ऐकावं लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात ते काय करतात हे पाहू, असा टोला रोहीत पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Lok Sabha : वडीलधाऱ्यांना म्हणा सासूचे चार दिवस संपले आता…; अजितदादांचा शरद पवारांना टोला

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -