घरमहाराष्ट्रLoksabha Election 2024: भाजपकडून प्रभारींची घोषणा; महाराष्ट्रासाठी तिघांची नावं

Loksabha Election 2024: भाजपकडून प्रभारींची घोषणा; महाराष्ट्रासाठी तिघांची नावं

Subscribe

नवी दिल्ली: 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सर्वच पक्ष आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. भाजपने आतापर्यंत राज्यात 24 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भाजपाने अनेक राज्यांसाठी निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाने हरियाणा भाजपचे माजी अध्यक्ष ओपी धनखर यांची दिल्लीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्याचबरोबर डॉ.दिनेश शर्मा यांना महाराष्ट्राचे प्रभारी करण्यात आले आहे. तर संजीव चौरसिया यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ही नियुक्ती तातडीने अंमलात येईल, असे भाजपने म्हटले आहे. (Loksabha Election 2024 BJP announces in charges Three names for Maharashtra while OP Dhankhar in charge of Delhi)

लोकसभा निवडणुकीबाबत भाजपमध्ये नुकत्याच झालेल्या विचारमंथनानंतर प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने 13 राज्यांसाठी 18 प्रभारी आणि उपप्रभारी नियुक्त केले आहेत. भाजपने दिनेश शर्मा यांना महाराष्ट्राचे प्रभारी केले आहे. त्याचबरोबर निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंग पवैया यांना महाराष्ट्राचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे.

- Advertisement -

पक्षाने रघुनाथ कुलकर्णी यांना अंदमान निकोबारचे सहप्रभारी बनवले आहे. नितीन नवीन यांना छत्तीसगडचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर कॅप्टन अभिमन्यू यांची आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने अलका गर्जूर यांची दिल्लीच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तर नलिन कुमार कटील यांना केरळचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे.

- Advertisement -

भाजपाचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक

आगामी निवडणुकांसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केल आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, स्मृती इराणी यांच्यासह महाराष्ट्रातील महायुतीचे बडे नेते आहेत.

(हेही वाचा: Maha Politics : विजय शिवतारेंची मनधरणी करण्यात सरकारला यश? पुढील भूमिका आज होणार स्पष्ट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -