घरमहाराष्ट्रMaha Politics : विजय शिवतारेंची मनधरणी करण्यात सरकारला यश? पुढील भूमिका आज...

Maha Politics : विजय शिवतारेंची मनधरणी करण्यात सरकारला यश? पुढील भूमिका आज होणार स्पष्ट

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिवसेना नेते विजय शिवतारेंसोबत काल रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीतून तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी आमदार, नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत शिवसेनेसोबत असले तरी शिवतारेंनी मात्र त्यांच्याविरोधात बोलणे कायम ठेवले. अजित पवारांविरोधात न बोलता युतीधर्म पाळावा, असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विजय शिवतारे यांना देण्यात आले. मात्र, तरी देखील शिवतारेंनी अजित पवारांविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका मागे घेण्यास नकार दिल्याचेच पाहायला मिळाले. तर बारामती लोकसभेतून निवडणूक लढण्यावरही ठाम असल्याचे शिवतारेंकडून सांगण्यात आले. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवतारेंची समजूत काढण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. (Maha Politics : Is the government successful in persuading Vijay Shivtare)

हेही वाचा… Loksabha 2024 : शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांना पहिला फटका; रामटेकमधून राजू पारवे यांचा अर्ज दाखल

- Advertisement -

काल बुधवारी (ता. 27 मार्च) रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विजय शिवतारे यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती असून शिवतारेंनी पुकारलेल्या बंडावर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज (ता. 28 मार्च) शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याचे समजते. वर्षा येथे झालेल्या बैठकीत शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.

महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. परंतु, बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी न देता त्या लोकसभेची मागणी विजय शिवतारे यांच्याकडून करण्यात आली. पण याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने शिवतारे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. पण आता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच शिवतारेंची भेट घेतल्याने या बैठकीत सकारात्मक तोडगा निघल्याचे बोलेल जात आहे. आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेत पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत शिवतारे यांची पत्रकार परिषद होत नाही, तोपर्यंत ते पुढील निर्णय नेमका काय घेणार हे सांगता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -