एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला : संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली.

sanjay raut

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी “आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे”, असे म्हटले आहे. ट्विट करत संजय राऊत यांनी आपली भुमिका मांडली. (Lost a sensitive cultured chief minister says sanjay raut)

“मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. या संवादाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे आता मातोश्रीहून राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंह यांची भेट घेऊन ते राज्यपालांना आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाच्या नेत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पेडा भरवत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जल्लोष साजरा केला. त्यामुळे आता लवकरच राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे.


हेही वाचा – माझ्याच लोकांनी मला फसवलं, सहकार्याबद्दल धन्यवाद, मुख्यमंत्री भावूक