घरमहाराष्ट्रLPG Price : गॅस सिलिंडरच्या नवे दर जाहीर, जाणून घ्या स्वस्त झाला...

LPG Price : गॅस सिलिंडरच्या नवे दर जाहीर, जाणून घ्या स्वस्त झाला की महाग

Subscribe

मुंबई : दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल आणि वायू विपणन कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅसचे नवे दर जाहीर करतात. आज जुलै महिन्याचा पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या किमतीत एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र यावेळी दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दुसरीकडे, गेल्या महिन्यात विमान कंपन्यांना एअर टर्बाइन इंधनवर (ATF) दिलासा मिळाला होता, मात्र आज त्यांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. (LPG Price New prices of gas cylinders announced know whether it has become cheaper or more expensive)

हेही वाचा – Buldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; 25 प्रवाशांचा

- Advertisement -

देशात 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर दिल्लीत 1,773 रुपये, कोलकात्यात 1,857 रुपये, मुंबईत 1,725 ​​रुपये आणि चेन्नईमध्ये 1,937 रुपयांना विकला जात आहे. घरगुती सिलिंडरबद्दल बोलायचे झाल्यास, 14.2 किलोचा सिलेंडर दिल्लीत 1,103 रुपये, कोलकात्यात 1,129 रुपये, मुंबईत 1,102.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,118.50 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.

एअर टर्बाइन इंधनाच्या किमती वाढल्या

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMC) आज एटीएफच्या किमती वाढवल्या आहेत. एटीएफच्या किमतीत 1476. 88 रुपयांनी वाढ झाली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. दर सुधारल्यानंतर, एटीएफची किंमत आता दिल्लीत 90,779.88 रुपये, कोलकात्यात 99,793.45 रुपये, मुंबईत 84,854.74 रुपये आणि चेन्नईमध्ये 94,530.51 रुपये प्रति किलो झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे गटाचे आज शक्तिप्रदर्शन, मुंबई महापालिकेवर मोर्चा

गेल्या महिन्यापासून घरगुती सिलेंडरचे दर स्थिर 

गेल्या वर्षी 6 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर गेल्या एक वर्षापासून स्थिर आहेत.

व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत

दरम्यान, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढउतार सुरूच आहे. यावर्षी दिल्लीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1769 रुपये होती. मात्र मार्च महिन्यात दर 2119.50 रुपयांवर पोहोचला. तर एप्रिल आणि मे मध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती घसरण होताना दर अनुक्रमे 2028 रुपये आणि 1856.50 रुपयांवर पोहचला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -