घरताज्या घडामोडीमुसळधार पावसामुळे राज्यातील २८ जिल्ह्यांना फटका; १०५ जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे राज्यातील २८ जिल्ह्यांना फटका; १०५ जणांचा मृत्यू

Subscribe

आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाले आहे. या पूरस्थितीमुळे राज्यातील तब्बल २८ जिल्ह्यांना पूराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाले आहे. या पूरस्थितीमुळे राज्यातील तब्बल २८ जिल्ह्यांना पूराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. पूराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या पूरस्थितीमुळे १०५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे सध्या वर्ध्यांत सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्यस्थिती एनडीआरएफचे जवान घटनास्थळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले आहेत. (Maharashtra 28 districts affected and 105 people dead due to heavy rains and floods)

या २८ जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशीम, यवतमाळ, धुळे, जालना, अकोला, बुलढाणा, भंडारा, नागपूर, नंदुरबार, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, नांदेड, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सांगली, चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

राज्यात सततच्या पावसामुळे विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. परिणामी नदीकाठच्या स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, गडचिरोलीत सिरोंचामध्ये चार दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे.

गावाला पुराचा वेढा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचाला चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा जलमय झाले आहे. वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा कायम आहे

मागील २४ तासांत २० मिमी. एवढा सरासरी पाऊस नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे. तसेच, जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले आहेत.

३५ मदत केंद्रे

जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. दरम्यान, कोंकण विभागात -रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत.

वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वा. पासून ते सायंकाळी ७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, संध्याकाळी ७ वाजता ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर-१, रायगड-महाड-१, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ अशा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत. राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.


हेही वाचा – अपघातग्रस्त एसटी बसमधील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून १० लाखांची मदत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -