Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 Live Maharashtra Assembly Budgeः विधान परिषदेचे आजचे कामकाज संपले

Live Maharashtra Assembly Budgeः विधान परिषदेचे आजचे कामकाज संपले

Subscribe

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, उत्पादनांना हमीभाव, वाढती महागाई यामुद्द्यांवरून विरोधक आज सत्ताधाऱ्यांना भिडणार आहेत. तसंच, आजच अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

विधान परिषदेचे आजचे कामकाज संपले

आगामी पावसाळी अधिवेशन १७ जुलैला मुंबईत होणार

- Advertisement -

 

मुंबईतील रस्त्यांच्या पुनर्रपृष्टीकरणाच्या मुद्द्यावरून अनिल परब आक्रमक. मंदीप इंटरप्राईझ कंपनीवरून उपस्थित केले प्रश्न.

- Advertisement -

 

राहुल गांधी तुरुंगात राहतील पण माफी मागणार नाहीत- जितेंद्र आव्हाड


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानपरिषदेतील उपस्थितीनंतर विरोधकांचा संताप मावळला

विधानपरिषदेत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या गैरहजेरीवरून विरोधकांचा संताप


– विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड आमने सामने

– वास्त्रोद्योग प्रशानावर लाड बोलत होते. त्यावर मी तुमच्याकडे माहिती मागितली नसून तुम्ही का बोलत आहात असा प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारला

– त्यावर नीलम गोऱ्हे यांनीही प्रसाद लाड यांना समज दिली


समृद्धी महामार्गासाठी अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केलेल्या कंत्राटदारांना शिंदे – फडणवीस सरकारचा दिलासा

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधान परिषदेच्या लेखी उत्तरात सर्व कारवाई रद्द करत असल्याची माहिती

लेखी उत्तरात सध्या शासनाकडे सुरू असलेल्या दंडनीय कारवाईची प्रकरणे देखील रद्द करत असल्याची घोषणा

समृद्धी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन झाल्याच्या अनेक तक्रारी येऊन देखील थेट कंत्राटदारांवरील कारवाई रद्द करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे


राहुल गांधीप्रकरणी सभागृहाची बैठक अर्धा तासासाठी स्थगित

विधानसभेची बैठक १० मिनिटांसाठी स्थगित

राहुल गांधीप्रकरणी सत्ताधारी सभागृहात आक्रमक

राहुल गांधींनी माफी मागावी – आशिष शेलार

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द सहन करणार नाही- केसरकर

राहुल गांधींविरोधात सभागृहात घोषणाबाजी


कोणत्याही सरकारी शाळांचं वीज कनेक्शन कापणार नाही- केसरकर


उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र विधान भवनात दाखल


मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार आजही संतापले


विधानभवनात सत्ताधाऱ्यांचे पायऱ्यांवर आंदोलन

राहुल गांधींनी माफी मागावी याकरता सत्ताधाऱ्यांचे आंदोलन


मराठी भाषा  भवनासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी बोलावली बैठक

दीपक केसरकर, उद्धव ठाकरे बैठकीला हजर राहण्याची शक्यता


 

- Advertisment -