घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ३१,९६४ रुग्ण कोरोनामुक्त, २० हजार २९५...

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ३१,९६४ रुग्ण कोरोनामुक्त, २० हजार २९५ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. पण तरी देखील राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवण्यात आल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात गेल्या २४ तासांत २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५७ लाख १३ हजार २१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.४६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ४४३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू मागील ४८ तासातील तर १५५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यात २ लाख ७६ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४६ लाख ८ हजार ९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख १३ हजार २१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २० लाख ५३ हजार ३२९ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १४ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.


हेही वाचा – Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईतील दुप्पटीचा दर वाढला, चारशेच्या उंबरठ्यावर

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -