घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यात ९ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर...

Maharashtra Corona Update: राज्यात ९ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर ६६ रूग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे. तर मागील २४ तासांत २५ हजार १७५ इतके रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ७५ लाख ३८ हजार ६११ इतके रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६० टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५५,५४,७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,०३,७०० (१०.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ७,२४,७२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

काल ५ फेब्रुवारी रोजी राज्यात ११ हजार ३९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली .तर २१ हजार ६७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कालच्या रूग्णांची तुलना केली असता आज राज्यात २ हजार रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

मुंबईत ५ हजार ७४३ रूग्णांची नोंद

गेल्या २४ तासांत मुंबईत ५३६ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे. तसेच २४ तासांत १ हजार १५३ रूग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ७४३ इतकी आहे.

- Advertisement -


हेही वाचा : Lata Mangeshkar : पुष्पचक्र वाहून पंतप्रधान मोदींनी लतादीदींना वाहिली आदरांजली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -