विविध क्षेत्रातून महाराष्ट्राने देशाला प्रेरित केलं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य समारातील विरांना समर्पित क्रांती गाथा ही वास्तू समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे, असं मोदी म्हणाले.

महाराष्ट्राने विविध क्षेत्रातून देशाला प्रेरित केलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आज संबोधित केलं. त्यांनी आजच्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत ‘क्रांती गाथा’चे उद्घाटन झाल्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य समरातील विरांना समर्पित क्रांती गाथा ही वास्तू समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे, असं मोदी म्हणाले. (Maharashtra inspired the country through various fields – Prime Minister Narendra Modi)

हेही वाचा – पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी, नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन

‘क्रांती गाथा’चं उद्घाटन केल्यानंतर मोदी म्हणाले की, हे क्रांती गाथा भवन महाराष्ट्रासाठी नवी उर्जा देणारी ठरेल. तसेच, राज्यपालांनी म्हटल्याप्रमाणे राजभवन हे लोकभवन आहे, ते जनता जनार्दनासाठी उपयोगी ठरेल.

‘जर आपण क्रांतीकारांची चर्चा करत असू तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरपर्यंत आपल्याकडे चांगला इतिहास आहे. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोखामेळासारख्या अनेक संतांनी देशाला ऊर्जा दिली आहे. स्वराज्याविषयी सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आजही भारतीय राष्ट्रभक्तीच्या भावनेला प्रबळ करते’, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा – विविध क्षेत्रातून महाराष्ट्राने देशाला प्रेरित केलं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतो तेव्हा आपण काही घटनांपुरतेच मर्यादित विचार करतो. पण भारताच्या स्वातंत्र्यात असंख्य लोकांनी योगदान दिलं आहे. स्थानिक पातळीवर घडलेल्या अनेक घटनांना एकत्रित परिणाम म्हणून भारत स्वातंत्र्य झाला. त्यावेळी प्रत्येकाची साधनं वेगवेगळी होती पण संकल्प एकच होता असंही ते म्हणाले. सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक भूमिका कोणतीही असली किंवा आंदोलनाची जागा कोणतीही असली तरीही भारत स्वातंत्र्य होणं हे एकच लक्ष्य होतं, असं म्हणत त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील घटनेला उजाळा दिला.

मुंबई हे स्वप्नांचं शहर तर आहेच, पण महाराष्ट्रात अनेक अशी शहरं आहेत जी २१ व्या शतकात देशाचे ग्रोथ सेंटर बनणार आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनमधील बदल, मेट्रोचं जाळं, रस्त्यांची विकासकामं पाहिली की भारताच्या विकासाची सकारात्मकता जाणवते असंही मोदी म्हणाले.

दरम्यान, ‘क्रांती गाथा’सारख्या स्थळावर शालेय पिकनिक घेऊन गेल्यास शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती काहीतरी करायची उर्मी जागृत होईल, असं म्हणत मोदींनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना येण्याच आवाहन केलं आहे.