Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सावधान! लॉकडाऊनचा मेसेज पसरवतायं?

सावधान! लॉकडाऊनचा मेसेज पसरवतायं?

लॉकडाउनचा मेसेज पाठवणाऱ्यांवर होणार पोलीस कारवाई, अनिल देशमुखांचा इशारा

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत, याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरज पडल्यास लॉकडाऊन घोषित केला जाऊ शकतो असे संकते दिले. त्यानंतर सोशल मिडियावरही सध्या लॉकडाऊन जाहीर होणार अशा मॅसेजला उधाण आले आहे. अनेक जण लॉकडाऊन होणार असे मॅसेज एकमेकांना फॉरवर्ड करत आहेत. मात्र तुम्ही देखील सोशल मिडियावरून लॉकडाऊनचे मॅसेज फॉरवर्ड करत असाल तर सावध! कारण लॉकडाऊनचे खोटे मॅसेज पसरणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सांगताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

राज्यात वाढत्या कोरोनामुळे लॉकडाऊन होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत अनेक जण सध्या लॉकडाऊन जाहिर म्हणून घोषित करत खोटे मॅसेजेस सोशल मिडियावर व्हायरल करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र आता अशा गैर समज पसरवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. कारण या सोशल ठगांवर आता राज्याची पोलीस यंत्रणा करडी नजर ठेवून असणार आहे.


हेही वाचा- संजय राठोड पोहरादेवीला येणार, मंदिराच्या परिसरात फौजफाटा तैनात

 

- Advertisement -