घरमहाराष्ट्रमोठी बातमी! महाराष्ट्रात १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार

मोठी बातमी! महाराष्ट्रात १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार

Subscribe

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊन सुरु आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला, त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज राज्य सरकारच्या मंत्रीमडळाची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपेंनी माहिती दिली.

ब्रेक द चैन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन केलं आहे. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावं लागेल, अशी परिस्थिती आहे. सर्व मंत्री लॉकडाऊन वाढण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी लॉकडाऊन १५ दिवस वाढवायचं की काय करायचं, याचा निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. लॉकडाऊन हे वाढणारच आहे. हे लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढेल असा माझा अंदाज आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

- Advertisement -

सरसकट मोफत लसीकरण, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्ष १८ ते ४४ अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात १ मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात ५ कोटी ७१ लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी तब्बल १२ कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर ६ हजार ५०० कोटी रुपयांचा भार असणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -