घरट्रेंडिंगVideo: प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी ट्रेन चालवली उलटी!

Video: प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी ट्रेन चालवली उलटी!

Subscribe

या घटनेचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ६९ हजारपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे.

चालत्या ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडला त्यामुळे त्याचा जीव वाचवण्यासाठी ट्रेन चालकाने चक्क ट्रेन उलटी चालवली. ट्रेन चालकाने अंदाजे अर्धा किलोमीटर ट्रेन उलट्या बाजूने चालवली आणि जखमी प्रवाशाला ट्रेनमध्ये बसवून रुग्णालयात पाठवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच या ट्रेन चालकाचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील या ट्रेन चालकाचे कौतुक केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भुसावळ विभागातील पाचोरा ते माहेजी स्थानकादरम्यान एक प्रवासी खाली पडला. रेल्वे सुरक्षा रक्षकास ही घटना लक्षात आली आणि त्याने तात्काळ ही घटना ट्रेन चालकाला सांगितली. ट्रेन चालकाला ही घटना समजल्यानंतर त्याने ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत गाडी उलटी चालवली. त्यानंतर त्या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या या जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, ‘पाचोरा ते माहेजी या रेल्वे स्थानका दरम्यान ट्रेनमधून पडलेल्या जखमी प्रवाशासाठी आज ट्रेन चालकाने ट्रेन जवळपास ५०० किलोमीटर मागे नेली आणि प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेसह आपले कर्तव्य पार पाडले याचे उत्तम उदाहरण आहे.’

- Advertisement -

हा व्हिडिओ पियुष गोयल यांनी ६ फेब्रुवारीला शेअर केला होता. मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ६९ हजारपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. तर १६ हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून २ हजारपेक्षा अधिक रिट्विट केला आहे.


हेही वाचा – Video: लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -