Live Updates : ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो ठाण्यात राष्ट्रवादीने पाडला बंद

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो ठाण्यात राष्ट्रवादीने पाडला बंद


महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या समस्या ऐकणार – राहुल गांधी

देशातील तरूणांकडे रोजगार नाही – राहुल गांधी


राहुल गांधी यांचे देगलूरमध्ये आगमन, भारत जोडो यात्रेचे देगलूरमध्ये भव्य स्वागत


राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल; बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण सहभागी


मशाल हातात घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल


40 गद्दारांनी राज्यातील वातावरण घाणेरड केलं, आदित्य ठाकरे यांचा घणाघात


काही लोकं फोटो काढण्यासाठी आपल्या तालुक्यात येतात, सत्ता गेल्यानंतर बांधावर आले- अब्दुल सत्तार


खासदार सुप्रिया सुळेबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीची महिला आयोगाकडे तक्रार


खासदार श्रीकांत शिंदे सिल्लोडमध्ये दाखल, अब्दुल सत्तारही रॅलीत सहभागी


मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मोर्चा

अब्दुल सत्तारांच्या घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक


सूप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली

शिवीगाळ करत अब्दुल सत्तारांची सूप्रीया सुळेंवर टीका

२४ तासांत शब्द मागे घेण्याचा राष्ट्रवादीचा अल्टीमेटम अन्यथा महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल, असा इशारा


बेस्टमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप

मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार


पिंपरीमध्ये ‘हर हर महादेव’चा शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडला


मोरबी दुर्घटनेची गुजरात हायकोर्टाकडून दखल; गुजरात सरकारडून मागितला अहवाल


ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठाकरे गटाचे कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन


EWS आरक्षण कायम राहणार; सर्वोच्च न्यायालयातील 5 पैकी 4 न्यायाधीशांचे समर्थन


आर्थिक आरक्षण वैध असल्याचे तीन न्यायमूर्तीचे मत

आर्थिक आरक्षण घटनापीठातील 3 न्यायमूर्तीचे समर्थन

आर्थिक आरक्षण घटनाविरोधी नाही – न्या. दिनेश माहेश्वरी

सर्वोच्च न्यायालयात EWS आरक्षणावर सुनावणी सुरू

न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांच्याकडून निकाल वाचनाला सुरुवात


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज


श्वसनाचा त्रास होत असल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल


ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार; सचिन अहिर यांची माहिती


पालघरमध्ये जव्हार-सिल्व्हासा मार्गावर 2 एसटी बसचा भीषण अपघात

अपघातात 20 ते 25 प्रवाशी जखमी

जखमींवर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू


पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने

वैतरणा आणि विरार स्थानकामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत


राज्यात आजपासून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे

संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे

भारत जोडो यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल