घरताज्या घडामोडीबच्चू कडू-रवी राणांमध्ये 'वर्षा'वर अडीच तास बैठक; तोडगा निघाला का?

बच्चू कडू-रवी राणांमध्ये ‘वर्षा’वर अडीच तास बैठक; तोडगा निघाला का?

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईत आपल्या 'वर्षा' निवासस्थानी बोलावले होते.

गेल्या काही दिवसांपासून माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईत आपल्या ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले होते. त्यानुसार, रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर बच्चू कडू, रवी राणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत जवळपास अडीच तास बैठक झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. (maharashtra politics meeting cm eknath shinde varsha banglow mla bacchu kadu and mla ravi rana)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आमदार बच्चू कडू दाखल झाल्यानंतर रवी राणाही दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यातील बैठकीला सुरूवात झाली. या संदर्भात वर्षावर तब्बल अडीच तास बैठक झाली, मात्र काय निर्णय झाला? याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास सर्व नेत्यांनी नकार दिल्याचे समजते.

- Advertisement -

मात्र, आज दोन्ही नेते आपापली भूमिका मांडणार असल्याचे समजते. तसेच, दोन्ही नेत्यांकडून वाद मिटल्याचे जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू हे दोन्ही नेते आज सकाळी 9 वाजता ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून वाद मिटल्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. यानंतर दोन्ही नेत्यांमधील या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बोलावण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – मंगळवारपासून गाडीत सर्वांनाच ‘सीटबेल्ट’ बंधनकारक, अन्यथा होणार कारवाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -