घरमहाराष्ट्रसाहेब निर्णय मागे घ्या; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रडले, काही हात जोडून उभे राहिले

साहेब निर्णय मागे घ्या; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रडले, काही हात जोडून उभे राहिले

Subscribe

सभागृहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रडले तर काही हात जोडून शरद पवारांसमोर उभे राहीले. तसचं, शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते एकच घोषणाबाजी करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सभागृहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रडले तर काही हात जोडून शरद पवारांसमोर उभे राहीले. तसचं, शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते एकच घोषणाबाजी करत आहेत. ( Maharashtra Politics sharad Pawar Sir reverse the decision NCP activists cried some stood with folded hands )

लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. कुठे थांबायचे हे मला कळतं, म्हणून एनसीपीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडली. यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे.

- Advertisement -

शरद पवारांच्या या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावून झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा शेकडो कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आल्या.

( हेही वाचा शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी )

- Advertisement -

निर्णय मागे घ्या, माझी विनंती- प्रफुल्ल पटेल

लोकांच्या भावना आम्ही जाणून आहोत. साहेबांनी आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला. आम्ही ही स्तब्ध आहोत. आम्ही हात जोडतो तुम्ही निर्णय मागे घ्या. साहेबांच्या भावना तुमच्याशीही जोडलेल्या आहेत. मी विनंती करतो, त्यांनी फेरविचार करावा, त्यांनी निर्णय मागे घ्यावा, या देशाला, महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. साहेबांनी फेरविचार घ्यावा, असी माझी विनंती आहे, त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -