घरमहाराष्ट्रसंरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्राचा टक्का कमी : लेफ्टनंट घंगाळे

संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्राचा टक्का कमी : लेफ्टनंट घंगाळे

Subscribe

लष्करात युवकांसाठी भरपूर संधी उपलब्ध

नवीन नाशिक : लष्करी अधिकारी घडविणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात आहे. परंतु, प्रबोधिनीत महाराष्ट्रीयन टक्का फार कमी आहे, अशा शब्दांत नवनियुक्त लेफ्टनंट वेदांत प्रशांत घंगाळे यांनी खंत व्यक्त केली. लष्करात युवकांसाठी भरपूर संधी उपलब्ध असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लष्कराकडे करिअर म्हणून बघावे, असे आवाहनदेखील लेफ्टनंट घंगाळे यांनी केले.

नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक ३० मधील गोविंदनगर भागात राहणार्‍या वेदांत प्रशांत घंगाळे याने पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण घेऊन डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमीत एक वर्ष कालावधीचे अतिशय कठीण प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारतीय सेनेत लेफ्टनंट या अतिशय महत्वाच्या पदावर ते विराजमान झाले. यानिमित्त माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी त्यांचा सत्कारसोहळा आयोजित केला होता. यावेळी लेफ्टनंट घंगाळे बोलत होते.

- Advertisement -

वेदांत घंगाळे यांची नियुक्ती ही नाशिककरांसाठी अतिशय भूषणावह आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण (बंटी) तिदमे यांनी वेदांतचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. भारतीय लष्कराच्या विजयाचे प्रतिक असलेला टी-55 हा रणगाडा लेखानगर येथे ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणई लेफ्टनंट घंगाळे यांचा जाहीर सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सोहळ्याप्रसंगी कृष्णराव बेदडे, शरद जाखडे, प्रकाश काळे, नंदकुमार दुसानीस, वामनराव रहाणे, प्रभाकर आहिरे, राजेंद्र चौधरी, हेमंत कोठारी, संजय भालेराव, विक्रम भांबेरे, अजय पंडित, धवल डरांगे, कुणाल उगलमुगले, नीलेश शिवले आदींसह ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -