घरमहाराष्ट्रमालेगाव बॉम्बस्फोट २००८ - कर्नल पुरोहितांना दिलासा नाही

मालेगाव बॉम्बस्फोट २००८ – कर्नल पुरोहितांना दिलासा नाही

Subscribe

२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्याच्या प्रक्रियेला त्वरित स्थगिती देण्यात यावी यासाठी कर्नल श्रीकांत पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी याआधी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्याच्या प्रक्रियेला त्वरित स्थगिती देण्यात यावी यासाठी कर्नल श्रीकांत पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी याआधी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर कर्नल पुरोहित यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. Unlawful Activities (Prevention) Act अर्थात युएपीए कायदा लागू करण्यात येण्यालाही कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयाकजून मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणासंदर्भात कोणताही दिलासा मिळाला नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.


‘सत्र न्यायालयानेच निर्णय घ्यावा’

दरम्यान, कर्नल पुरोहित यांच्याविरोधात युएपीए कायदा लागू करण्यात यावा की नाही? याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व निर्णय सत्र न्यायालयानेच घ्यावेत असे नमूद केले आहे. मात्र, सत्र न्यायालयाने याआधीच कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळून लावली असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

SIT संदर्भातील मागणीही फेटाळली

याशिवाय मालेगाव बॉम्बस्फोट २००८च्या प्रकरणाची एसआयटी अर्था विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, ही याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यासंदर्भात सत्र न्यायालयच निर्णय घेऊ शकेल असे न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -