घरमहाराष्ट्रविदर्भात येऊन विदर्भाचेच प्रश्न अनावश्यक? विधान परिषदेत भाजप-शिवसेनेचे आमदार भिडले

विदर्भात येऊन विदर्भाचेच प्रश्न अनावश्यक? विधान परिषदेत भाजप-शिवसेनेचे आमदार भिडले

Subscribe

विधान परिषदेत आज संत्री उत्पादकांवर चर्चा झाली. संत्री पिकावर झालेला प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसानभरपाई, सर्वेक्षण आदी मुद्द्यांवर विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली. तसंच, विमासंरक्षणात कोणती फळं येतात, नुकसानभरपाईचे निकष काय याबाबत प्रश्न विचारले गेले. याप्रश्नी मंत्री उदय सामंत उत्तरे दिली.

नागपूर – विदर्भात येऊन विदर्भाचेच प्रश्न अनावश्यक वाटतात का यावरून आज विधान परिषदेत शिवसेना आणि भाजपात खडाजंगी झाली. संत्री उत्पादकांच्या प्रश्नांवरून विधान परिषदेत लक्षवेधी मांडत असताना मनिषा कायंदे यांनी अनावश्यक प्रश्नांवर चर्चा नको असं म्हटलं. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये काहीकाळ बाचाबाची झाली. मात्र, विधान परिषद पिठासीन अधिकारी निरंजन डावखरे यांनी मध्यस्ती करत दोन्ही पक्षांतील नेत्यांना शांत केले.

हेही वाचा – रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत विरोधक आक्रमक; थेट गृहमंत्र्यांवर आरोप

- Advertisement -

विधान परिषदेत आज संत्री उत्पादकांवर चर्चा झाली. संत्री पिकावर झालेला प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसानभरपाई, सर्वेक्षण आदी मुद्द्यांवर विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली. तसंच, विमासंरक्षणात कोणती फळं येतात, नुकसानभरपाईचे निकष काय याबाबत प्रश्न विचारले गेले. याप्रश्नी मंत्री उदय सामंत उत्तरे दिली.

पुढील प्रश्न विचारण्यासाठी रणजित पाटील उभे राहिले असता मनिषा कायंदे यांनी अनावश्यक प्रश्न नको म्हणून सूचना केली. मात्र, विदर्भात येऊन विदर्भातील प्रश्न अनावश्यक वाटले का यावरून रणजित पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. मनिषा कायंदे यांना आपले शब्द मागे घेण्याची विनंती करण्यात आली. तसंच, याप्रकरणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनीही मनिषा कायंदे यांच्यावर आगपाखड केली.

- Advertisement -

हेही वाचा – 20हून कमी पदसंख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही, शालेय शिक्षणमंत्र्यांची ग्वाही

संत्री उत्पादकासंदर्भातील प्रश्न विदर्भासाठी महत्त्वाचा आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. मग हा प्रश्न अनावश्यक कसा वाटतो, या प्रश्नामुळे वेळ कसा वाया जातो? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. त्यावर विधान परिषदेतील पिठासीन अधिकारी निरंजन डावखरे यांनी सभागृहातील मनिषा कायंदे यांचे वक्तव्य तपासले जाऊन ते हटवले जातील, असं आश्वासन दिलं. निरंजन डावखरे यांनी आश्वस्त केल्यानंतर रणजित पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी शांत भूमिका घेतली.

हेही वाचा – राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळले

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -