घरमहाराष्ट्रमराठा आरक्षण रद्द पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

मराठा आरक्षण रद्द पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील मराठा आरक्षण रद्द केलं आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळून लावत राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा रद्द केला आहे. मात्र, हा निकाल देत असताना न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा केला होता. त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. यावर गेल्या काही महिन्यांपासूनया याचिकांवर सुनावणी सुरु होती. आज या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. मात्र, हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

- Advertisement -

न्यायालयाने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ९ सप्टेंबर २०२० पर्यंत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्यांनी ९ सप्टेंबर २०२० पर्यंत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे, ते सुरक्षित आहेत. या निर्णयाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -