घरताज्या घडामोडीMaratha Reservation: मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य विरोधाभास करणारे, मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य विरोधाभास करणारे, मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न

Subscribe

राज्यपालांना पत्र देऊन मराठा आरक्षण मिळते का?

राज्य सरकार मराठा आरक्षणावर पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा समाजाच्या डोळ्यात चक्क धुळफेक करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. एकदा मुख्यमंत्री बोलतात कायदा योग्य आहे नंतर बोलतात कायदा टीकणारा बनवण्यात आला नाही. यावरुन मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नसल्याचे दरेकरांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत मराठा आरक्षण कायद्या संदर्भात निवेदन दिले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच निशाणा साधला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मागास आयोग हा स्वायत्त आहे. मागसल्या जातीमध्ये मागासलेपण आहे का, याची केंद्रीय आयोग खातरजमा करुन केंद्र सरकारला सांगेल, केंद्र सरकार कधीही हस्तक्षेप केंद्रीय मागासवर्गीय आयोगात करु शकत नाही. किंबहुना केंद्रीय मागासवर्गीय आयोगात स्वायत्तेने आपले मत त्या ठिकाणी मांडू शकतो. म्हणून मला वाटत ही पळवाट काढण्याचा प्रयत्न आणि मराठा समाजाच्या डोळ्यात चक्क धुळफेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा दिसतो आहे.

- Advertisement -

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटल्यानंतर केलेले वक्तव्य विरोधाभास करणारे आहे. पहिले मुख्यमंत्री म्हणाले की, कायदा योग्य आहे. त्याबरोबर कायदा सर्वानुमते सर्व पक्षाने एकमताने केला आहे. मुख्यमंत्री पहिले बोलतात कायदा योग्य आहे. नंतर काही वेळाने मुख्यमंत्री बोलतात कायदा त्या ठिकाणी टीकणारा बनवण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट नसल्याचे दिसते आहे.

राज्यपालांना पत्र देऊन मराठा आरक्षण मिळते का? त्याबाबत एक प्रक्रिया असते. त्यामुळे अशा प्रकारचा भूलथापा अशा शिष्ट मंडळाच्या माध्यमातून देत असाल तर मराठा समाज दुतखुळा नाही. मराठा समाजाच्या संघटना अभ्यासू आहेत. त्यांचे नेत्यांनी या प्रकरणाचा किस का पाडलेला आहे. या ठिकाणी मराठा आरक्षणाला एक सिस्टम आहे. त्या सिस्टमने न जाता केवळ आपण जाऊन राज्यपालांना पत्र दिले आणि राज्यपालांनी केंद्र सरकारला कळवावे एवढं सोप असते तर आपलीही मध्यस्थितीची गरज नसती तर मराठा आरक्षणाचा कायदा राज्यपालांनी केंद्र सरकारला दिलाही असता असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -