घरमहाराष्ट्रकायदा फुलप्रूफ असता तर आम्हाला राज्यपालांची भेट घ्यावी लागली नसती; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना...

कायदा फुलप्रूफ असता तर आम्हाला राज्यपालांची भेट घ्यावी लागली नसती; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Subscribe

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही फुलप्रूफ कायदा दिला होता, पण या सरकारला टीकवता आला नाही, असं म्हटलं होतं. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ असता तर राज्यपालांना भेटण्याचा योग आला नसता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. “फुलप्रूफ कायदा होता तर त्याचं काय झालं ते सगळ्यांच्या समोर आहे…म्हणूच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं. तो जर का फुलप्रूफ असता तर आज भेटण्याचा योग यासाठी आला नसता,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार

मराठा आरक्षणासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेलं पत्र राज्यपांलांना दिलं. राज्यपालांच्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.


हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -