घरमहाराष्ट्रमुंबई महापालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी 'आपलं महानगर'च्या मारुती मोरेंची बिनविरोध निवड

मुंबई महापालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी ‘आपलं महानगर’च्या मारुती मोरेंची बिनविरोध निवड

Subscribe

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवडणूक आज, शुक्रवारी मुंबई महापालिका पत्रकार कक्षात पार पडली. यावेळी वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी ‘आपलं महानगर’चे प्रतिनिधी मारुती मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवी कार्यकारिणी 2023-2025 या द्विवार्षिक कार्यकाळासाठी निवडण्यात आली आहे.

मारुती मोरे हे मुंबई महापालिका मुख्यालयात गेल्या 22 वर्षांपासून वृत्तसंकलन करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते ‘आपलं महानगर’ या लोकप्रिय दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे माजी महापौर, सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, अधिकारीवर्ग यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या प्रेमळ, मनमिळावू, सहकार्यासाठी तत्पर अशा वृत्तीमुळे वार्ताहर संघातील बहुतांश पत्रकारांनी त्यांना अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. सहकाऱ्यांची ही भावना व प्रेमभाव पाहून, त्यांचा मान राखत अध्यक्षपदाच्या निवडणुकीला ते उभे राहिले. तथापि, सर्वांच्या सहमतीने बृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी मारुती मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

- Advertisement -
आपलं महानगर प्रतिनिधी मारुती मोरे

या निवडणुकीत उपाध्यक्षपदी सचिन धानजी (हिंदुस्थान पोस्ट), दिनेश सिंह (दै. हमारा महानगर), सरचिटणीसपदी राजेश सावंत (दै. पुढारी), सहचिटणीसपदी अजय जाधव (ई टीव्ही भारत) व हेमंत साटम (दै. महाराष्ट्र टाइम्स) यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, खजिनदार . श्रीरंग सुर्वे (दै. प्रात:काल), सहखजिनदार गिरीश चित्रे (दै. नवशक्ती), हिशोब तपासनीस प्रसाद रावकर ( दै. लोकसत्ता), रईस अहमद अन्सारी (मुंबई उर्दू न्यूज) यांची आणि सदस्यपदी संजय जाधव ( दै. पुण्यनगरी), देवेंद्र भगत (दै. सामना), कृष्णात पाटील (झी – २४ तास), विनायक डावरुंग (टीव्ही 9 मराठी), कल्पेश म्हामूणकर (दै. फ्री प्रेस), ओ. पी. तिवारी (दै. नवभारत), इंद्रायणी नार्वेकर (दै. लोकसत्ता), सीमा दाते (लोकशाही) यांची निवड देखील बिनविरोध करण्यात आली. तसेच, सल्लागारपदी विष्णू सोनवणे (आकाशवाणी) व नितीन चव्हाण (दै. महाराष्ट्र टाइम्स) यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वार्ताहर संघाच्या माध्यमातून, मुंबई महापालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणी सर्वांच्या सहकार्याने मार्गी लावण्याचे आश्वासन मारुती माने यांनी अध्यक्षीय भाषणात दिले.

- Advertisement -

नव्या कार्यकारिणीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह व बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष विष्णू सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी अनेक पत्रकार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -