घरमहाराष्ट्रअभियांत्रिकी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा!

अभियांत्रिकी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा!

Subscribe

तुम्ही अभियांत्रिकी आणि मेडिकलचे विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आता या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

मेडिकल आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर तीन महिन्याच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. अनेक विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र अद्याप आले नसल्यामुळे त्यांना कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून आता १० ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

काय होता बदल?

६ सप्टेंबर २०१७ ला सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला विद्यार्थ्यांनी मेडिकलला प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र दिले तर त्यांना प्रवेश द्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर या प्रवेशांसाठी NEET घेण्यात आली. या परीक्षेनंतरही पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र जमा केले नाही. तर त्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्यात आला. त्यातील मेरीट लिस्टच्या आधारे त्यांना प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता प्रवेश प्रक्रियेदरम्यान तीन महिन्यात हे जातपडताळणी प्रमाणपत्र जमा करायचे आहे. पण हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणारा कालावधी पाहता विद्यार्थ्यांना अडथळा होऊ नये म्हणून आता ही मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -